Homeव्हिडिओ बातम्याअल्पवयीन आत्याचार प्रकरणी तरुणाला जन्मठेपेची शिक्षा जवळके येथील घटना

अल्पवयीन आत्याचार प्रकरणी तरुणाला जन्मठेपेची शिक्षा जवळके येथील घटना

अल्पवयीन आत्याचार प्रकरणी तरुणाला जन्मठेपेची शिक्षा
जवळके येथील घटना
जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील जवळके गावात साधारण एक वर्षांभरापुर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना घडली होती.
ज्यामध्ये १४ वर्षीय वयाच्या अल्पवयीन मुली सोबत जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपी ऋषिकेश पिमराव वाळुंजकर (वय २३ वर्षे) रा जवळके ता .जामखेड याला विशेष तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी जन्मठेप व १०,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. ११मार्च २०२४ रोजी जवळके गावात १४ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुली सोबत जबरदस्ती शारीरिक संभंध प्रस्थापित करण्याची घटना घडली होती.

या प्रकरणात आरोपी ऋषिकेश पिमराव वाळुंजकर याच्या विरुद्ध खर्डा पोलीस स्टेशन गुरंनं. 53/2024 भा.दं.वि. कलम 376 (2)(आय)(जे)(एन) आणि बाल लैंगिक अत्याचार प्रति अधिनियम कलम 4, 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणाचा तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांनी केला आहे.

सरकारी वकील म्हणून श्रीमती कापसे यांनी केस चालवली, तर मदतनीस म्हणून पो हवालदार संभाजी शेंडे आणि कोर्ट अंमलदार पो कॉ. नामदेव रोहकले यांनी कामकाज पाहिले मा. विशेष तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी या प्रकरणाचा निकाल देताना आरोपी ऋषिकेश पिमराव वाळुंजकर यास जन्मठेप व १०,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

ही शिक्षा बाल लैंगिक अत्याचार प्रति अधिनियम आणि भारतीय दंड संहिता अनुसार दिली गेली आहे.या निकालामुळे जामखेड तालुकयात अशा घटनांना आळा बसेल असे वाटते.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!