Homeव्हिडिओ बातम्यावैकुंठवासी अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय शोकसभेत साश्रू नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली: हक्काचा माणुस...

वैकुंठवासी अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय शोकसभेत साश्रू नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली: हक्काचा माणुस आहे :अनावर भावना, साआश्रु नयनांनी श्रद्धांजली

जामखेडमध्ये हक्काचा माणुस गमावल्याची भावना

वैकुंठवासी अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय शोकसभेत साश्रू नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली

हक्काच माणुस गमावल्याची भावना

 अनावर भावना, साआश्रु नयनांनी श्रद्धांजली.

जामखेड प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपुर्ण राज्यावर शोककळा पसरली असून या दुःखद घटनेच्या पाश्र्वभूमीवर जामखेडमध्ये दि ३० जानेवारी रोजी सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती.

तहसील कार्यालयासमोर झालेल्या शोकसभेतला नगराध्यक्षा प्रांजलताई अमित चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, शहाजी काका राळेभात, डॉ भास्कर मोरे, नगरसेवक महेश निमोणकर, वसीम शेख, प्रविण चोरडिया,तात्याराम पोकळे, प्रशांत राळेभात, प्रा विकी घायतडक,पवन राळेभात,राजेंद्र गोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, सुर्यकांत मोरे, बबन काका काशीद, राजेंद्र पवार, सुरेश भोसले, संभाजी राळेभात, सुनिल जगताप, संजय वराट, ,बीलाल शेख, अमोल गिरमे, प्रकाश काळे, इस्माईल सय्यद, विनायक राऊत, मंगेश आजबे,पांडुरंग माने, हरिभाऊ आजबे, शिवसेनेचे आकाश बाफना, शामीरभाई सय्यद,काँग्रेसचे राहुल उगले, शहाजीराजे भोसले, मनसेचे प्रदिप टापरे,आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष नवलाखा, जेष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात, भाजपा तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे, डॉ भगवान मुरुमकर, दत्तात्रय वारे,बाजीराव गोपाळघरे, जमीरभाई सय्यद स्वप्निल खाडे, जितेंद्र बोरा, बापुसाहेब शिंदे,गणेश काळे,गणेश हगवणे,जयसिंग उगले, लक्ष्मण ढेपे, वैजीनाथ पोले,राष्ट्रवादी काँग्रेस माजी तालुकाध्यक्ष अंजलीताई ढेपे,नगरसेविका नंदाताई होळकर, आशाताई घायतडक, सुरेखा सदाफुले या मान्यवरांसह नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.


महाराष्ट्रातील सकारात्मक विचार असलेले नेतृत्व शासन, प्रशासनावर आदपुर्वुक सक्षम पकड असलेले नेतृत्व, सर्व सामान्यांशी नाळ जोडणारे नेतृत्व, समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे नेतृत्व, आठरपगड समाजाला बरोबर घेणारे नेतृत्व ,शिव शाहु फुले आंबेडकर यांच्या विचाराशी बांधिलकी असणारे नेतृत्व हरपले आहे. अशा भावना व्यक्त केल्या गेल्या. श्रद्धांजलीपर भावना व्यक्त करतांना आठवणी सांगितल्या. आठवणु अनुभव सांगतांना अनेक वक्त्यांना भावना अनावर झाल्या होत्या. अनेकांना बोलतांना दूख होत होते.डोळ्यातुन आश्रु येत होते.पसायदानाने शोकसभेचा समारोप करण्यात आला.

पत्रकार यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!