Homeव्हिडिओ बातम्यामोटारसायकली सुरक्षित ठेवा, दुकानासमोरुन स्कुटी लंपास

मोटारसायकली सुरक्षित ठेवा, दुकानासमोरुन स्कुटी लंपास

मोटारसायकली सुरक्षित ठेवा

दुकानासमोरुन स्कुटी लंपास

जामखेड प्रतिनिधी


जामखेड शहरासह तालुक्यात छोट्या मोठ्या चोरांनी उच्छाद मांडला आहे. कोणतीच वस्तु कोठेही सुरक्षित दिसत नाही. सुरक्षित राहील याची खात्री वाटत नाही.
नूकतीच जामखेड शहरातील बीडरोडवरील हर्ष मशिनरी या दुकानाबाहेर पार्क केलेली पांढऱ्या रंगाची अ‍ॅक्टिव्हा स्कूटी चोरांनी लंपास केली आहे.


या घटनेप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अज्ञात चोरट्याचा शोध घेतला जात असुन या घटनेमुळे मोटारसायकल मालिकांमध्ये दारात लावलेल्या मोटारसायकल बाबत सूरक्षेती धास्ती बसली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी प्रविण कचरदास बाफना (वय ४५ वर्षे, धंदाः हर्ष मशिनरी दुकान मालक, रा. हर्ष मशिनरी दुकान, बीडरोड, ता. जामखेड, यांच्या माहितीनुसार, चोरी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८:०० वाजता ते ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७:३० वाजेपर्यंत घडली असून दुकानाबाहेर पार्क केलेली अँक्टिव्हा कंपनीची पांढऱ्या रंगाची स्कूटी (मोटारसायकल क्रमांक: MH १६ AX) 3533 चोरट्याने आर्थिक फायद्यासाठी चोरून नेली आहे .सदर गुन्हा दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी जामखेड पोलीस स्टेशनात दाखल करण्यात आला आहे. बीएनएस २०२३ कलम ३०५(b) अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फिर्यादीने दिलेल्या हकिकतीनुसार, “कुणीतरी अज्ञात चोरट्याने स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी स्कूटी चोरून नेली असून पुढील तपास जामखेड पोलीस करीत आहेत.

पत्रकार यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!