Homeव्हिडिओ बातम्यागँस एजन्सीची मनमानी, नोंदणी करूनही टाकी देत नाहीत, तहसीलकडे तक्रार केल्यामुळे तुम्हाला...
गँस एजन्सीची मनमानी, नोंदणी करूनही टाकी देत नाहीत, तहसीलकडे तक्रार केल्यामुळे तुम्हाला टाकी देणार नाही ग्राहकाला स्पष्ट उत्तर, गँस एजन्सी मालकाचे व संबंधित प्रशासकीय अधिकारयांचे लागे बांधे?? चौकशी व कारवाईची मागणी
बावर गँसची मनमानी:
नोंदणी करूनही टाकी देत नाहीत;
तहसीलकडे तक्रार केल्यामुळे तुम्हाला टाकी देणार नाही. ग्राहकाला स्पष्ट उत्तर
गँस एजन्सी मालकाचे व संबंधित प्रशासकीय अधिकारयांचे लागे बांधे?? चौकशी व कारवाईची मागणी
ग्राहकाला मनस्ताप
चौकशी व कारवाईची मागणी
जामखेड प्रतिनिधी
जामखेड मधील बाबर एंटरप्रायजेस गँस एजन्सीची गॅस सिलेंडर वितरणात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आहे.वितरण कर्मचारयांची मनमानी कारभारामुळे याचा ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नोंदणी करूनही गँस टाकी दिली नाही. याबाबत चौकशी करून गँस एजन्सीवर कारवाई करण्याची मागणी जाकीर हुसेन हाफीजोडीन काझी यांनी तहसीलकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारयांना तहसीलदार यांच्यामार्फत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जाकीर उर्फ बाबू काझी जामखेड शहरातील रहिवासी असून घरगुती गॅस सिलेंडर वितरण करणारी बावर एजन्सीचा अधिकृत ग्राहक आहे. सदर एजन्सीकडून गँस नोंदणी करूनही बाबु काझी यांना वारंवार गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
घरगुती गॅस सिलेंडर टाकी पूर्णपणे संपत्यानंतर त्यांनी ऑनलाईन पद्धतीने सिलेंडर बुकिंग केले त्यानंतर सलग तीन ते चार दिवस त्यांनी एजन्सीकडे फोनद्वारे संपर्क साधला असता “आज गॅस सिलेंडर मिळेल असे उत्तर वारंवार देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात बारा दिवस होऊनही गॅस सिलेंडर मिळाले नाही.
तहसील असा प्रकार दोन वेळा बाबु काझी यांच्याबरोबर झाला.
घरगुती वापरासाठी अत्यावश्यक असलेल्या गॅसच्या अभावामुळे काझी यांना नाईलाजास्तव पर्यायी अवैध मार्गाने जास्त किमतीत गॅस सिलेंडर खरेदी करावा लागला. म्हणजे अवैध्य मार्गाने बावर गँस एजन्सी गॅस टाकी विकतात.
ही बाब अत्यंत गंभीर असून सामान्य ग्राहकांची आर्थिक व मानसिक पिळवणूक होत असल्याचे स्पष्ट दिसून येते. अशी पिळवणूक फक्त माझ्याच बाबतीत होत आहे की इतर ग्राहकांनाही अशाच प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे? तसेच बाहेर अवैध रित्या जास्त दराने विक्री होणारे गॅस सिलेंडर नेमके कुठून येतात, याची सखोल चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे.
याबाबत दि १२/०१/२०२६ रोजी तहसीलदार, जामखेड यांच्याकडे बाबर एंटरप्रायजेस विरुद्ध लेखी तक्रार अर्ज दिला होता. मात्र आजपर्यंत त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
तसेच बाबु काझी यांनी दि ०६/०२/२०२६ रोजी घरगुती गॅस सिलेंडर बुकिंग केले होते. सदर सिलेंडर आजपर्यंत त्यांना मिळालेला नाही. उलट दिनांक ११/०२/२०२६ रोजी सिलेंडर डिलिव्हर झाल्याचा संदेश प्राप्त झाला आहे, प्रत्यक्षात हे अत्यंत चुकीचे आहे. याबाबत वितरकास विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत आपण आमच्या विरोधात तक्रार दिल्यामुळे आपल्याला गॅस सिलेंडर दिला जाणार नाही,

तसेच तहसील कार्यालय व पुरवठा अधिकारी आमच्यावर कोणतीही कार्यवाही करणार नाहीत, असे स्पष्टपणे सांगितले आहे. नागरिकांच्या तक्रारींची संबंधित प्रशासन दखल घेत नाही. गँस एजन्सीवर कार्यवाही करत नाही त्यामुळे संबंधित वितरकांचे मनोबल वाढले असून ते ग्राहकांना उघडपणे त्रास देत आहेत. गँस एजन्सी मालकाचे व संबंधित प्रशासकीय अधिकारयांचे लागे बांधे असल्याचे कर्मचारयांच्या बोलण्यातून स्पष्ट होत आहे.
ही बाब अत्यंत गंभीर असून सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक व काळाबाजार मोठ्या प्रमाणावर होत आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित वितरकावर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी जाकीर हुसेन उर्फ बाबु काझी यांनी केली आहे.

पत्रकार यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!