Homeव्हिडिओ बातम्यामहाशिवरात्रीनिमित्त शिव महापुराण कथेचे आयोजन : जामखेड तपनेश्वर महादेव मंदिराच्या वतीने सामाजिक...

महाशिवरात्रीनिमित्त शिव महापुराण कथेचे आयोजन : जामखेड तपनेश्वर महादेव मंदिराच्या वतीने सामाजिक धार्मिक उपक्रम

 

महाशिवरात्रीनिमित्त ‘शिव महापुराण’ कथेचे आयोजन.

जामखेड श्री तपनेश्वर महादेव मंदिरात

जामखेड प्रतिनिधी

महाशिवरात्रीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून जामखेड येथील श्री तपनेश्वर महादेव मंदिर येथे भव्य ‘शिव महापुराण’ कथेचे आयोजन करण्यात आले असुनकथा प्रवक्ते: ह.भ.प. रामायणाचार्य श्री बाबा महाराज ढवळे हाळगावकर यांच्या मधुर वाणीतुन शिवपुराण श्रवण करण्याचा योग आला आहे.जामखेड तपनेश्वर गल्ली व पंचक्रोशीतील भाविकांनी या शिवपुराण कथेचे लाभ घ्यावा असे आवाहन श्री तपनेश्वर महादेव मंदिर आयोजकांकडून करण्यात आले आहे.

ह.भ.प. रामायणाचार्य श्री बाबा महाराज ढवळे हाळगावकर यांच्या मधुर वाणी तुन जामखेड तपनेश्वर गल्ली व पंचक्रोशीतील शिव भक्तांना प्रथमच या कथेचे श्रवण करण्याचा योग आला आहे .तसेच याच बरोबर ह.भ.प. कृष्णा महाराज व ह.भ.प. रविंद्र महाराज यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

शिव महापुराण कथा बुधवार, दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ ते रविवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ यादरम्यान पाच दिवस दररोज सायंकाळी ठीक ६:३० ते ८:३० या वेळेत शिव महापुराण कथा ठेवण्यात आलेली आहे

या धार्मिक महोत्सवाचे आयोजन श्री तपनेश्वर महादेव मंदिर परिसरातील सर्व शिवभक्त आणि समस्त भजनी मंडळ यांच्या वतीने करण्यात आले असून सर्व जामखेड तपनेश्वर व पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवून शिवकथेचे श्रवण करावे अशी विनंती श्री तपनेश्वर महादेव मंदिर आयोजकांकडून करण्यात आलेली आहे.

पत्रकार यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!