माणूसकी हरवली???
माणसाचा अंत्यविधी माणसाने अडवला:
आठवड्यातली दूसरी घटना :
शासन, प्रशासनाने अशा गावागावातील अडगळीच्या प्रश्नांवर कायमचा तोडगा, निर्णय लवकर देण्याची गरज आहे.
जामखेड प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथे
७४ वर्षाच्या लिंगायत समाजाच्या महिलेचा अंत्यविधी करण्यासाठी गावातील काही लोकांनी विरोध केला असल्याची दूर्दैवी माणुसकी शुन्य घटना पून्हा घडली आहे.
दि २८ सप्टेंबर २०२५ रोजी कै. पार्वती गुरुलिंग धवनगिरे वय ७४ वर्षे या लिंगायत समाजाच्या महिलेचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यविधीसाठी गावातील लोकांनी विरोध केला.
आठवड्यातभरातली अंत्यविधी अडविण्याची ही दूसरी घटना आहे. विरोध झाल्यानंतर सदर महिलेचा मृतदेह लिंगायत समाज बांधवांनी पोलिस ठाण्याच्या दारात आणला व या महिलेचे मृतदेह घेऊन गेले.
तेव्हा तेथील पोलिसांनी सांगितले की या प्रकरणाचा व आमचा काहीच संबंध नाही. तुम्ही तहसील कार्यालयात जावा असे सांगितले त्यानंतर हाच मृतदेह घेऊन कर्जत जि.अहिल्यानागर तहसिल कार्यालयाच्या समोर ठेवण्यात आला आहे.
आद्याप प्रशासनकाडुन न्याय मिळाला नाही. सदर गावात लिंगायत समाजाला स्मशानभुमी म्हणून प्रशासनाने जागा दिलेली आहे. मात्र ती जागा मालकीची असल्याचा दावा करत प्रशासनाच्या त्या निर्णयाला स्थगिती गावातील व्यक्तीकडून मिळविलेली आहे.
रात्री सदर मृतदेहाचा अंत्यविधी गावातील गायरान जमीनीवर करण्यात आला.
शासन व प्रशासनाने गावागावातील अशा अडगळीत पडलेल्या प्रश्नांची सोडवणूक तातडीने केली पाहिजे
कायमचा तोडगा निर्णय दिला पाहिजे.
कर्जत कोरेगावमध्ये घडलेल्या या घटनेचा निषेध वंचित बहुजन आघाडी व लिंगायत समाजाच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. याबाबत सकाळी ११.३० वाजता जामखेड तहसील कार्यालयासमोर जाऊन निवेदन देणार आहेत. 
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
