Homeव्हिडिओ बातम्याआ रोहित पवार यांच्या वाढदिवसाचा इतर खर्चाला फाटा : मैत्री गृप व...

आ रोहित पवार यांच्या वाढदिवसाचा इतर खर्चाला फाटा : मैत्री गृप व आर व्हि पाँलिमर्सच्या वतीने खर्डा धनेगाव येथे पुरग्रस्तांना धान्य कपडे संसारोपयोगी वस्तू वाटप

*आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इतर खर्चाला टाळून पुरग्रस्तांना मदतीचा हात*

आर व्ही पाँलिमर्स व मैत्री गृपच्या वतीने धनेगाव, खर्डा येथे पुरग्रस्तांना धान्य किराणा कपडे वाटप 

जामखेड प्रतिनिधी

आमदार रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातील कार्यकर्ते विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असतात. परंतु यंदा खुद्द आमदार रोहितदादा पवार यांनीच कार्यकर्त्यांना आवाहन केले की, राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी व नागरिक पूर्णपणे उध्वस्त झाले आहेत. अशा वेळी कार्यक्रमांवर खर्च न करता पुरग्रस्तांना मदत केल्यास त्यांना खरा आनंद होईल.

या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत वाढदिवसानिमित्त फ्लेक्स व जाहिरातींचा खर्च टाळून आर. व्ही. पॉलिमर्सचे मालक विशाल हांचे यांच्या वतीने व मैत्री ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सागर गवसने मराठा यांच्या संकल्पनेतून खर्डा येथील पुराने बाधित कुटुंबीयांना किराणा मालाचे वाटप करण्यात आले.

तसेच धनेगाव येथे पुराच्या पाण्याने वेढलेल्या दोन घरांतील धान्य, भांडी, कपडे व इतर संसारोपयोगी साहित्य वाहून गेले होते. त्या कुटुंबियांनाही तातडीची गरज लक्षात घेऊन रोख रक्कम देण्यात आली. पावसाचा जोर कायम असताना कार्यकर्त्यांनी भर पावसातच ही मदत थेट बाधितांच्या घरपोच केली.

या मदत वाटप कार्यक्रमाचे वितरण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जामखेड तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खर्डा ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर, अक्षय सुर्वे, कांतिलाल आहेर, बबन सुर्वे, नितीन गोलेकर, बाबू चव्हाण, अमोल लोखंडे, बाळासाहेब काळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!