Homeव्हिडिओ बातम्यापाऊस संपल्यावर डांबर टाकू :- शशिकांत सुतार :सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली दखल...

पाऊस संपल्यावर डांबर टाकू :- शशिकांत सुतार :सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली दखल :जामखेड करमाळा रोडवरील खड्डे बुजवण्यास सुरुवात

पाऊस संपल्यावर डांबर टाकु :- शशिकांत सुतार :

 

सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली दखल

जामखेड – करमाळा रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरूवात:

जामखेड प्रतिनिधी

जामखेड – करमाळा रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत त्यात पावसामुळे पाणी साचते वाहन चालवताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे असे वृत्त प्रकाशित होताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शशिकांत सुतार यांनी तातडीने दखल घेतली. रस्त्यावरील खड्डे जेसीबीच्या साहाय्याने तातडीने बुजवण्यासाठी यंत्रणा कामाला लावली. करमाळा रोडवरील

झिक्री गावालगत असणाऱ्या पुलावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने येथील पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अशाच प्रकारे जामखेड -करमाळा रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्त्यावरच मध्यभागी खड्डे पडले आहेत. वाहनधारकांना रस्त्यावरील खड्डे चुकवत वाहन चालवणे अवघड होत चालले आहे.

रस्ता धोकादायक बनला आहे. येथे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील पुलावरील पाणी इतरत्र हटविण्यात येऊन येथील खड्डे त्वरित बुजविण्यात यावेत, अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकांची मागणी होत होती. त्यासंदर्भात सिटीझन न्युज मध्ये वृत्त प्रकाशित होताच सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेतली.

———

जेसीबीच्या साहाय्याने खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे. पाऊस सतत पडत असल्याने डांबर टाकणे सध्या शक्य नाही पाऊस उघडल्यावर जामखेड करमाळा रोडवरील सर्व खड्डे डांबर टाकुन भरून घेण्यात येतील. असे अभियंता शशिकांत सुतार यांनी सांगितले.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!