Homeव्हिडिओ बातम्याझक्की पुलावरील खड्डे बुजवण्याची मागणी :जामखेड - करमाळा रस्त्यावर खड्डेच खड्डे

झक्की पुलावरील खड्डे बुजवण्याची मागणी :जामखेड – करमाळा रस्त्यावर खड्डेच खड्डे

जामखेड – करमाळा रस्त्यावर खड्डेच खड्डे

झिक्री पुलावरील खड्डे बुजवण्याची मागणी

जामखेड प्रतिनिधी

 

जामखेड – करमाळा रस्त्यावरील झिक्री गावालगत असणाऱ्या पुलावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने येथील पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अशाच प्रकारे जामखेड -करमाळा रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्त्यावरच मध्यभागी खड्डे पडले आहेत. वाहनधारकांना रस्त्यावरील खड्डे चुकवत वाहन चालवणे अवघड होत चालले आहे.

रस्ता धोकादायक बनला आहे. येथे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील पुलावरील पाणी इतरत्र हटविण्यात येऊन येथील खड्डे त्वरित बुजविण्यात यावेत, अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकांनी केली आहे.

जामखेड करमाळा रस्त्यावरील झिक्री गावालगत असणाऱ्या पुलावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने येथे मोठमोठे खड्डे पडली असल्याने या पुलावरून वाहनधारकांना येता-जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. या ठिकाणच्या खड्यांचा अंदाज न आल्याने अनेक दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. पुलावरील खड्डे चुकविताना अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांसह प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. येथील पूल अतिशय धोकादायक बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील पुलावरील पाणी काढून देणे आवश्यक आहे तसेच येथील खड्डे बुजवण्याची वाहनधारकांसह नागरिकांनी मागणी करत आहेत.

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!