नान्नज मारहाण प्रकरणी परस्पर फिर्याद दाखल :
आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्यासह दहा जणांविरोधात गून्हा दाखल :
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील नान्नज येथे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबातील सदस्यांवर प्राणघातक हल्ला झाला होताह याप्रकरणी वैभव साबळेंसह ७ जणांवर ॲट्रोसिटीसह विविध गुन्हे दाखल झाले होते.
वैभव साबळे सह एकुण ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.मात्र कोठडीत असताना वैभव साबळे यांनी जामखेड पोलिस स्टेशनला परस्परविरोधी फिर्याद दाखल केली आहे. यामध्ये आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, यशदिप साळवे (पूर्ण नाव माहीत नाही) अभिजीत संपत साळवे, सतिश अजिनाथ साळवे, अरविंद भालेराव, (पूर्ण नाव माहीत नाही),
आदर्श साळवे(पुर्ण नाव माहीत नाही ), सद्दाम पठाण (पुर्ण नाव माहीत नाही ),अभिजित साळवे (पुर्ण नाव माहीत नाही ), रतन साळवे (पुर्ण नाव माहीत नाही ) शिवानी साळवे (पुर्ण नाव माहीत नाही ), सर्व रा नान्नज ता जामखेड या दहा जणांविरोधात मारहाणीचा गून्हा दाखल करण्यात आला आहे.
वैभव साबळे यांनी फीर्यादीत म्हटले आहे की नान्नज येथे रविवार २४/८/२०२५ रोजी रात्री १०.३० वाजेसुमारास फिर्यादी
वैभव विजय साबळे व त्याचा मित्र अभयराजे भोसले
असे दोघेजण पानटपरी वरती बसलो होतो.
त्यावेळी गावातील दिग्विजय आबु सोनवणे हा पानटपरी जवळ आला.व अभय सोबत भांडू लागला. त्यावेळी फिर्यादी त्या दोघाचे भांडण सोडवले. त्यानंतर दिग्विजय याने इतर आरोपींना बोलावून घेतले. यावेळी आरोपींच्या हातात लोखंडी गज कोयता बांबू असे हत्यार होती.
या आरोपींनी फीर्यादीला हातातील हत्यारांनी मारहाण करत गळ्यातील चेन काढून घेतली. यानंतर आरोपीच्या घरातील महिलांनी फिर्यादीच्या पानटपरीवर दगड फेक करून मोडतोड केली. या मारहाणीत वैभव विजय साबळे व अभयराजे भोसले जख्मी झाले.
यानंतर फिर्यादी घरी गेले असता इतर आरोपींनी घरासमोर आरडाओरड करत शीवीगाळ करत निघून गेले. याप्रकरणी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्यासह दहा जणांविरोधात गून्हा दाखल करण्यात आला आहे. पूढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पो हेकाँ संजय लोखंडे करत आहेत.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
नान्नज मारहाण प्रकरणी परस्परविरोधी फिर्यादी दाखल :आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्यासह दहा जणांविरोधात गून्हा दाखल :
RELATED ARTICLES
