जामखेड नगरपरिषद नगरसेवकपदाचे आरक्षण जाहीर :स्त्रियांना ५० टक्के नगरसेवकपदे
जामखेड प्रतिनिधी
अनेक दिवसांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका घेण्याचे आदेश आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.जामखेड
नगरपरिषदेच्या नगरसेवक पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. लवकरच कोणत्या प्रभागासाठी राखीव तसेच महिला साठी हे कळणार आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जामखेड या “क” वर्ग नगरपरिषदेचीही निवडणूक प्रक्रिया जाहिर झाली असून नगरपरिषद प्रशासन विभागाचे नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक डॉ. प्रवीण गेडाम यांनी दि., १० जुलै २०२५ रोजी हे आदेश जारी केले आहे.
जामखेड नगरपरिषदेसाठी निवडून देण्यात येणाऱ्या नगरसेवकांची एकुण संख्या २४ असणार असून त्यापैकी १२ जागा महिलांसाठी राखीव असणार आहे. त्यानुसार जाहिर झालेल्या जागांनुसार ३ (तीन) जागा अनुसूचित जातींसाठी, १ एक जागा अनुसूचित जातीसाठी, ६ जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी असणार आहेत.आणि या सर्व २४ जागांसाठीमधूनन विविध प्रवर्ग व सर्वसाधारण अश्या १२ जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत.
यात अनुसूचित जाती ०२ नागरिकांचा मागास प्रवर्ग ०३ जागा राखीव असणार आहेत. सर्वसाधारण ०७नगरसेवक पदाच्या पडलेल्या आरक्षणानुसर साधारणपणे ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत प्रभागरचना होणार असल्याची माहिती जामखेड नगरपरिषद प्रशासनाने दिली आहे. जामखेड नगरपरिषद कार्यकारिणीचा कार्यकाळ संपुष्टात येऊन जवळपास पाच वर्षे नगरपरिषदवर प्रशासक नियुक्त आहेत.
त्यामुळे जामखेड शहराच्या विकासात अनेक अडथळे येऊन जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेची होत असलेली खुप महत्वाची ठरणार आहे.
———————–
जामखेड नगरपरिषद निवडणूकीसाठी अनुसूचित जमातीकरिता यावेळेस पाहिल्यांदाच एक पद राखीव असल्याने व मागील सार्वत्रिक निवडणुकीत सदरचे पद अनु. जमातीकरिता राखीव नसल्याने या सार्वत्रिक निवडणुकीत सदरचे पद अनु. जमाती महिलांकरिता राखीव होईल किंवा कसे. हे सोडतीद्वारे ठरविण्यात येईल. मात्र सोडतीनंतर सदरचे पद महिलांकरिता राखीव झाल्यास सर्वसाधारण महिला जागांची संख्या १ ने कमी होऊन ६ इतकी होईल.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
