Homeव्हिडिओ बातम्याजामखेडमध्ये संविधान चौकात फळ विक्रेत्यास बंदूकीची धमकी :रोज पैसे देण्याची मागणी :दोन...

जामखेडमध्ये संविधान चौकात फळ विक्रेत्यास बंदूकीची धमकी :रोज पैसे देण्याची मागणी :दोन जणांविरोधात गून्हा दाखल

 

जामखेड येथील संविधान चौकात फळ विक्रेत्यास बंदूकीची धमकी

रोज पैसे देण्याची मागणी

दोन जणांवर गुन्हा दाखल

जामखेड प्रतिनिधी
. सध्या जामखेड शहरात बंदूकीची धमकी देण्याचे प्रकार वाढतच चालले आहेत. तुला जर फळविक्रीचा व्यवसाय करायचा असेल तर आम्हाला पाचशे रुपये रोज दे असे म्हणत मारहाण करून बंदूकीची गोळी घालण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोन जणांविरोधात गून्हा दाखल करण्यात आला आहे.
दि ११ जूलै रोजी रात्री ८.३० वा
जामखेड शहरातील संविधान चौक लक्ष्मीआई मंदिरांचे समोर समीर बागवान फळ विक्री करत असतांना फळविक्रीचे गाडयावर आरोपी सोनु वाघमारे रा. आरोळेवस्ती जामखेड ता. जामखेड जि. अहील्यानगर, आदम जलाल शेख रा फक्राबाद ता. जामखेड जि अहील्यानगर हे आले व तुला जर फळविक्रीचा व्यवसाय करायचा असेल तर आम्हाला पाचशे रुपये रोज दयावे लागतील असे म्हणून फिर्यादीस चापटाने गालात मारहाण केली. विक्रीसाठी आणलेले सफरचंदाचे नुकसान करुन तु जर आम्हाला न विचाराता फळाचे दुकान लावले तर आमचेकडील बंदुकीने तुझे गांडीत गोळ्या घालू अशी धमकी दिली आहे. समीर बागवान यांच्या फिर्यादीवरुन सोनु वाघमारे व आदमी जलाल या दोघांवर गु र नं. ४०४/२०२५ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०८ (२), ३२४(४),११५(२),

३५२,३५१(२),३(५) प्रमाणे गुन्हा रजि दाखल करण्यात आला आहे.घटनेची माहिती मिळताच  पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, पोसई गावडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोस ई गावडे करत आहेत. सध्या जामखेड शहरासह तालुक्यात गुन्हेगारी मध्ये बंदूकीचा वापर तसेच धमकावण्याचे प्रकार वाढतच चालले आहेत. पोलीस प्रशासनाने याची वेळीच दखल घेऊन संबंधित गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे असे नागरिकांमधून मागणी होत आहे.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!