जामखेड तालुक्यातील १६ वर्षीय मुलीच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाचा तपास; प्रेमीयुगुलीचे मृतदेह आढळून आले :
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील मुलगी व कर्जत तालुक्यातील रावळगाव येथील मुलगा दोघेही सध्या रा महादेव नगर मांजरी पुणे या प्रेमीयुगलाचे
पुण्यातील खडकवासला धरणाजवळ दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत.
महादेव नगर, मांजरी येथील एका १६ वर्षीय मुलीच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारीनंतर केलेल्या शोधात दि ११ जूलै रोजी सकाळी ही दुःखद घटना समोर आली.
याबाबत पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार दि. १० जुलै २०२५ रोजी रात्री त्यांच्या बहिणीला एका फिजिक्स क्लासमध्ये सोडल्यावर ती परत आली नाही.
तिच्या शोधासाठी तिची बहिण अपूर्वा गुरसाळे सध्या रा. महादेव नगर मांजरी मूळचे राहणार खर्डा ता. जामखेड यांनी वानवडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सुरू झालेल्या तपासादरम्यान, मुलगा आणि मुलीने पुणे शहरातील खडकवासला धरणाजवळ विषारी औषधे सेवन करून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी कळविले.
फिर्यादी अपूर्वा गुरसाळे यांच्या माहितीनुसार, त्यांची १६ वर्षांची बहिण अक्षरा गुरसाळे क्लास संपल्यानंतर परत आली नाही. त्यानंतर तिला कोणीतरी फसवून नेल्याची शक्यता वानवडी पोलिसांसमोर नोंदवली गेली. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात अपराध नोंद 278/2025 खाली गुन्हा करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक लोंढे तपास करीत होते .
संशयित मुलगा संतोष बाळासाहेब कळसाईत सध्या रा. महादेव नगर मांजरी मूळचे राहणार रावळगाव तालुका कर्जत जि. अहिल्यानगर याचा सुद्धा शोध घेतला जात होता. त्याचा फोन संध्याकाळपासून बंद असल्याने त्याचा पत्ता शोधण्यात पोलीस अंमलदार गुंतले होते. उत्तम नगर पोलिसांनी कळविले की दोघांचे मृतदेह खडकवासला धरणाजवळ आढळले असून प्राथमिक माहिती नुसार त्यांचा दोन ते तीन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे दिसून आले आहे. मुलीच्या कुटुंबाला या नात्याचा विरोध होता, असेही प्राथमिक तपासात समोर आले आहे.

सदर प्रकरणाचा तपास सुरु असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
