तिसऱ्या अपत्यामुळे सरपंचपद, सदस्य पदही रद्द
तिसरं अपत्य झालं, ‘या’ बाईंचं सरपंच पद गेलं !
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील रत्नापुर हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे गाव मानले जाते. रत्नापुर ग्राम पंचायतींच्या लोकनियुक्त महिला सरपंच राणी जाधव यांचं संरपचपद रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी दिले आहेत.
राणी जाधव यांना ३ अपत्ये असल्यामुळे सरपंचपद आणि सदस्य पद रद्द करण्याचे आदेश काढण्यात आले आहे. परंतु, या आदेशा बद्दल नाशिक आयुक्तांकडे दाद मागण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी त्यांना देण्यात आला आहे. राणी जाधव या सप्टेंबर 2022 पासून लोकनियुक्त सरपंच म्हणून रत्नापूर ग्रामपंचायतीमध्ये निवडून आल्या होत्या. 2025 मध्ये त्यांना तिसरे अपत्य झालं आहे. रत्नापुर गावात तालूक्यचेर नेतृत्व करणारे नेते आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले आहे. तरीही या घडामोडीमागे कोण आहेत.
त्यामुळे त्यांचं ग्रामपंचायतीचं सदस्य पद आणि सरपंच पद रद्द करून त्यांच्या फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी लेखी तक्रार श्रीकांत रामचंद्र पवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली होती.
या तक्रारीवर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी श्रीकांत पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर पुरावे सादर केले, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी राणी जाधव यांच्यासरपंच पद अन् सदस्य पद रद्द करण्याचे आदेश दिले. रत्नापुर गावात तालूक्यचेर नेतृत्व करणारे नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले आहे. तरीही या घडामोडीमागे कोण आहेत. 

राणी जाधव या माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय वारे यांच्या गटाच्या असून ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आहेत. दत्तात्रय वारे हे राजकीयदृष्टय़ा सुज्ञ व्यक्तिमत्व आहे. नाशिक आयुक्त्यांतांकडे न्याय मागण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी आहे आता दत्तात्रय वारे काय भुमिका घेतात तसेच नाशिक आयुक्तांचा काय निकाल येतो याकडे तालूक्याचे लक्ष लागले आहे. लागले आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
