Homeव्हिडिओ बातम्याबसमधे चढतांना गळ्यातील मंगळसूत्र चोरले : बस पोलीस ठाण्यात ; एका प्रवासी...

बसमधे चढतांना गळ्यातील मंगळसूत्र चोरले : बस पोलीस ठाण्यात ; एका प्रवासी महिलेवर गून्हा दाखल

 

बसमध्ये चढताना महीलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरले:

एका महीलेविरोधात गुन्हा दाखल

जामखेड प्रतिनिधी

जामखेड बस स्थानकावर पाहुण्यांना बस मध्ये बसवुन देत असताना गर्दीचा फायदा घेत महीलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीस गेल्याचे लक्षात आले. यानंतर प्रवाशांसह बस थेट जामखेड पोलीस स्टेशनला आणण्यात आली. फिर्यादीच्या सांगण्यावरून बसधीलच एका महीले विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की फीर्यादी महीला सुनंदा सुभाष वायकर वय ४३ वर्षे, रा. निगडी ता. हवेली जि. पुणे या जामखेड येथुन सोमवार दि २५ ऑगस्ट रोजी आपल्या पाहुण्यांना सोडवण्यासाठी जामखेड येथील बस स्थानकात सायंकाळी ५.३० वाजता आल्या होत्या. यावेळी बस आल्या नंतर फीर्यादी या बस मध्ये पाहुण्यांना बसवुन देण्यासाठी बस मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत आरोपी महीलेने फीर्यादी यांच्या गळ्यातील पाच ग्रॉम वजनाचे ३० हजार रुपये किमतीचे मणिमंगळसुत्र चोरीला गेले.बस मधून उतरल्यावर लगेचच त्यांच्या लक्षात आले की गळ्यातील मणिमंगळसुत्र हे चोरीस गेले आहे. या नंतर फीर्यादी यांनी त्यांच्या नातेवाईकांना घटनास्थळी बोलवुन घेतले. सदर एस टी बस थेट जामखेड पोलीस स्टेशनला आणण्यात आली.गाडीत मोठ्या प्रमाणात गर्दी होती यामध्ये फीर्यादी सुनंदा वायकर यांच्या सांगण्यावरून बसमध्ये प्रवास करीत असलेल्या आरोपी गवळणबाई फुलचंद काळे, वय ७० वर्षे, रा. उड्डानवडगाव ता. नेकनुर, जिल्हा. बीड हीच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महीलेस पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पो.ना. जितेंद्र सरोदे हे करीत आहेत.

बस स्थानकात चोऱ्यांचे प्रमाण वाढले–

जामखेड एस टी बस स्थानकाच्या नवीन एस टी बसस्थानकाचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. जुन्या बस स्थानकात कसलाही निवारा नसल्याने सध्या प्रवासी उघड्यावर बसची वाट बघत बसतात. अनूकवेळा छेडछाडीच्या व चोरीच्या घटना या बस स्थानकात घडत आहेत. अनेक वेळा नागरीक व प्रवाशांनी या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशी मागणी केली आहे. मात्र याकडे संबंधित एस टी अगार विभाग कानाडोळा करीत आहेत. त्यामुळेच अज्ञात चोरटे गर्दीचा फायदा घेत महीलांच्या बॅग मधिल दागिने चोरी करीत आहेत. आतातरी एसटी अगार विभागाने याठिकाणी सीसीटीव्हीत कॅमेरे बसवावेत अशी मागणी प्रवासी करीत आहेत.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!