Homeव्हिडिओ बातम्याछत्रपती शिवाजी महाराजांची शत्रुच्या स्त्रियांनाही माता भगिनींसमान वागणूक : जात धर्म न...
छत्रपती शिवाजी महाराजांची शत्रुच्या स्त्रियांनाही माता भगिनींसमान वागणूक : जात धर्म न पहाता न्यायाचे स्वराज्य स्थापन केले. नगरपरिषदच्या वतीने खर्डा चौकात शिवजयंती साजरी. सर्व पक्षीय सर्व समाजबांधवांनी लावली उपस्थिती
छत्रपती शिवाजी महाराजांची शत्रुच्या स्त्रियांनाही माता भगिनींसमान वागणूक, जात धर्म न पहाता न्यायाचे स्वराज्य स्थापन केले :- नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी
नगरपरिषदच्या वतीने खर्डा चौकात शिवजयंती साजरी
सर्वपक्षीय सर्व समाजबांधवांनी लावली उपस्थिती

जामखेड प्रतिनिधी
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे, पराक्रम, धैर्य, न्याय आणि स्वाभिमानाचे सर्वोच्च प्रतीक छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्याय, अत्याचार आणि परकीय सत्तेविरुद्ध लढा देत स्वराज्याची स्थापना केली.
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्रीला मातेसमान मानले. जात धर्म न पहाता आठरपगड समाजातील मावळ्यांना घेऊन न्यायाचे स्वराज्य स्थापन केले.
सर्व धर्मांना समान न्याय, स्त्रियांचा सन्मान, शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे रक्षण हाच स्वराज्य स्थापनेचा विचार होता अशा माझ्या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा असे प्रतिपादन नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी यांनी केले. जामखेड शहरातील खर्डा चौकात नगरपरिषदेच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी बोलत होत्या. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे सर्वच मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी सर्वपक्षीय नगरसेवक सर्व पक्षीय राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
जेष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात अझरुद्दीन काझी, मुख्तार सय्यद अमित चिंतामणी, डॉ भगवान मुरुमकर, सभापती शरद कारले, मंगेश आजबे, गटविकास अधिकारी शुभम जाधव, मुख्याधिकारी अजय साळवे,
नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, नगरसेवक प्रा विकी घायतडक, महेश निमोणकर, तात्याराम पोकळे, राजेद्र गोरे, गणेश डोंगरे, वसीम शेख,संजय काशिद, श्रीराम डोके, प्रविण सानप, ईस्माईल सय्यद, ज्ञानेश्वर झेडे, सागर टकले, अर्जुन म्हेत्रे, अनिल सदाफुले, मनोज कुलकर्णी, सागर आष्टेकर, संभाजी कोकाटे, संजय राऊत,नगरसेविका नंदाताई होळकर, वैशाली म्हेत्रे, आशाबाई टकले, जयाताई गव्हाळे, सिमाताई कुलकर्णी, संगीता भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक
पवन राळेभात यांनी केले.
पत्रकार यासीन शेख 9423391215 
error: Content is protected !!