कमानी, फ्लेक्स बोर्ड ठरतायेत वादाचे कारण, गावागावात संबंधित प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज, नायगावात फ्लेक्स वरून वाद ;३८ जणांवर गुन्हा दाखल
कमानी, फ्लेक्स बोर्ड ठरतायेत वादाचे कारण
–——————
RELATED ARTICLES
जामखेड तालुक्यातील नायगाव येथे महाशिवरात्रि व श्रीनाथ महाराज यात्रा उत्सव दि १७ फेब्रुवारी २०२६ साजरा करण्यात आला. “महाशिवरात्रि व श्रीनाथ महाराज यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांचे स्वागत” असा फ्लेक्स बीएसएनएल चौकासमोर लावण्यात आला.त्यावर तब्बल ३८ जणांचे फोटो व नावे छापील होते.हे सर्व एकाच गृपचे असल्याचे समजते. तरिही फोटोवरील व्यक्तींमध्येच वाद उफाळला. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नायगावाचे पोलीस पाटील संतोष मुरलीधर उगले यांच्या तक्रारीवर खर्डा पोलीस स्टेशनने गुन्हा क्र. २१/२०२६ दाखल केला.
भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ कलम २२३ (सार्वजनिक शांतता भंग), ३ (५) व महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा १९९५ कलम ३ अंतर्गत नोंद केली आहे.यामध्ये मिथुन साहेबराव ढावरे,अमोल साहेबराव ढावरे दोघे रा. नायगाव. लखन बबन मिसाळ रा. सोनेगाव. समाधान लक्ष्मण साठे, आदेश दशरथ खवळे, बाळु साहेबराव ढावरे, धनंजय रामा खवळे,भाऊसाहेब साहेबराव ढावरे,सोपान दशरथ खवळे, कुणाल दत्तात्रय चांदणे, ओमकार भरत खवळे, निखिल संतोष खवळे,सुधीर मधुकर गायकवाड,विकास अशोक खवळे,सागर नामदेव साठे, शरद बापु खवळे,जिवन दादा खवळे,करण संजय खवळे, सुरेश हनुमान खवळे,विशाल अनासराव खवळे,सागर रावसाहेब खवळे,आकाश हरी खवळे, सुरज संतोष ससाणे,अभिषेक लक्ष्मण साठे,विजय भाऊसाहेब खवळे,आकाश बजरंग खवळे,वैभव ईश्वर भंडारे,अभिमान अनासराव खवळे,अजय भाऊसाहेब ढवळे, सनी बाबु खवळे,सागर शहाजी खवळे,संकेत भरत खवळे,राहुल बाळु खवळे,बाबु बजरंग खवळे,बबलु राजु खवळे,राहुल बाबु खवळे, केशव गणेश पुरी,श्रीमंत दादाराव खवळे,पांडुरंग मलप्पा काळे हे सर्व ३८ जण जामखेड तालुक्यातील आहेत.सदरची खर्डाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार दशरथ नागरगोजे, संदीप धामणे, प्रविण थोरात, शशी म्हस्के, धनराज बिराजदार यांनी केली आहे. पुढील तपास पो.हवा. संदीप धामणे करत आहेत.

काही गडबड झाली तरच प्रशासन शांतता कमिटीची बैठक बोलावून शांतता राखण्याचे आवाहन करण्याचे सोपस्कार पार पाडते. दरम्यान जामखेडला फ्लेक्स बोर्डाच्या कारणावरून दूहेरी हत्याकांड झाले आहे. त्यानंतर शहरात फ्लेक्स न लावण्याचा ग्रामसभेत ठरावही मंजूर केला गेला.त्यानंतर चिक्कार बोर्ड लागत आहेत तेही विनापरवाना,मात्र कारवाई दुरच संबधितांकडे परवाना सूध्दा प्रशासन विचारत नाहीत.