नंबर ब्लॉक का केलास? नर्तिकेवर कोयत्याने हल्ला करणार आरोपी जामखेड पोलिसांच्या ताब्यात

भुम बसस्थानकावरून ताब्यात

जामखेड पोलीसांची कामगिरी

जामखेड प्रतिनिधी

 तु मला फोनवर का बोलत नाहीस, माझा नंबर का ब्लॉक केला आहे. असे म्हणून शिवीगाळ करून, दोन्ही हातावर कोयत्याने मारून फिर्यादी नर्तकीला गंभीर जखमी करून फरार झालेला आरोपीच्या जामखेड पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत, जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात मारून जखमी केले व तु जर मला बोलली नाही तर संपवून टाकीन अशी धमकी दिली होती जखमी महिलेच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा रजि. नं.६५/२०२६ बी एन एस कलम १०९,३५२,३५१ (२), शस्त्र अधिनियम कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यांनतर सदर आरोपीचा शोध घेत असताना दि. १४/०२/२०२६ रोजी पोनि दशरथ चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, आरोपी राहुल अशोक कचरे रा. खळेगाव ता. गेवराई जि.बीड हल्ली रा. मिलींदनगर, जामखेड ता. जामखेड जि. अहिल्यानगर हा भुम बसस्थानक ता.भुम जि.धाराशिव येथे येणार आहे. अशी बातमी मिळाल्याने पोनि दशरथ चौधरी यांनी सदरची माहीती गुन्हे शोध पथकाचे पोकों/२४२७ देविदास पळसे, पोकों/ ७५४ कुलदिप घोळवे, पोकॉ/१०१३ आकाश शेवाळे यांना दिली.

सदरचे पथक खाजगी वाहनाने भुमकडे आरोपी राहुल अशोक कचरे याचा शोध घेण्यासाठी रवाना झाले. सदर पथक भुम पोलिसांच्या मदतीने भुम बसस्थानक परिसररात शोध घेत असताना आरोपी राहुल अशोक कचरे हा ९/०० वाजणेचे सुमारास बसस्थानक परिसरात एका झाडाखाली त्याचे अस्तित्व लपवून उभा असल्याचे दिसुन आले तेव्हा पथकाने त्यास ताब्यात घेतले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे साो अहिल्यानगर,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे, कर्जत विभाग कर्जत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, महिला. सपोनि जाधव मॅडम, पोकॉ/२४२७ देविदास पळसे, पोकों/ ७५४ कुलदिप घोळवे, पोकॉ/१०१३ आकाश शेवाळे, भुम पोलीस स्टेशनेच पोना संदेश क्षिरसागर तसेच दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पोकों / नितीन शिंदे, राहुल गुंडू यांनी कारवाई केली आहे.

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!