गावं आपलं , गावातील सर्व माणसं आपलीच
एकमेकांच्या संपर्कात रहा, गावागावांत पावसामुळे जनजीवन विस्कळीत
प्रशासन अलर्ट
जवळा, खर्डा, तेलंगशी, आनंदवाडी, लोणी, बांधखडक, नाहूली, जायभायवाडी अलर्ट:
जामखेड प्रतिनिधी

दोन दिवसापूर्वी निर्माण झालेली सारखी पुरपरस्थिती पून्हा ओढावली आहे. दि २६ सप्टेंबर रोजीच्या मध्यरात्री विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्यात कहर केला आहे. सध्या शहरासह तालुक्यात सातही महसुल मंडळात पाऊस चालूच आहे. खर्डा, जवळा, लोणी, मोहरी, दिघोळ, बांधखडक लोणी आनंदवाडी जायभायवाडी तेलंगशी भागात मोठय़ा प्रमाणावर नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासन अलर्ट झाले आहे. आधिकारी व गावातील जवाबदार लोक कायम संपर्कात आहेत.
अनेक भागातील शेती व रस्ते पुन्हा पाण्याखाली गेले तर खर्डा जवळा गावात काही घरात पाणी शिरले.खर्डा भागातील खैरी नदीला मोठा पुर आल्याने खैरी धरणातून १७ हजार क्युसेक विसर्ग सुरु झाला , खैरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.अतिवृष्टीमुळे मोहरी नदीलाही पुर आला आहे.
नदीवरील पुल पाण्याखाली गेलाय दुसरीकडे बांधखडक खर्डा व परिसरात पावसाचा कहर चालूच आहे.
या पावसाने खर्डा येथील कौतुका नदीला पूर आला असून परिस्थिती आवाक्याबाहेर जाताना दिसत आहे. कौतुका नदीच्या काठावर असलेले लोखंडे परिवारातील कुटुंबाच्या घरांना पाण्याने वेढा दिला आहे.
या कैकाड झरा परिसरात विठ्ठल लोखंडे, लक्ष्मण लोखंडे, गोरख लोखंडे, विष्णू लोखंडे, व भोई समाजाचे घरे आहेत. घरामध्ये सुद्धा पाणी शिरले असून पाऊस उघडण्याची चिन्हे नाहीत.
काही लोकांचे दगड माती विटा चे कच्चे बांधकाम असून घरे पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
अशा परिस्थितीत जीव मुठीत धरून या लोकांना सामना करावा लागत आहे. शासन स्तरावर या चांभार वस्ती व भोई समाजासह परिसरातील लोकांचे जीवन विस्कळीत झाले आहे.
घराबाहेर पडण्यासही मुश्किल झाले असून प्रशासन या कुटुंबाची दखल तातडीने घेण्याची गरज आहे.खर्डा शहराशी अनेक भागांचा संपर्क तुटला आहे.
धामणगाव तेलंगशी रस्ता पाण्याखाली गेला आहे.
बांधखडक येथे एका शेतकरयाने स्वतःच्या घर बांधकामासाठी शेतातून पुलावरून पाईपलाईन खोदल्ल्यामुळे दोन दोन फूट खोल पुल तुटला आहे. नंतर त्याची दुरुस्ती न केल्यामुळे हा पुल सध्याच्या पुराने कोसळला आहे. या पूलाची दूरूस्ती लवकरच होणे गरजेचे आहे.
*तेलंगशी तलाव ओव्हर फ्लो झाल्याने नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. राजुरी भागातही प्रचंड पाऊस झाला. जामखेड खर्डा रस्त्यावरुन या भागात पाणी वाहत होते. खर्डा परिसरात पावासाने दाणादाण उडवून दिली आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे.नांदणी नदीला पूर आला आहे.
नदीकाठच्या अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे. जवळा गावात काही घरांमध्ये पाणी शिरल्याचे वृत्त आहे. खैरी नदीला महापुर स्थिती निर्माण झाल्यामुळे धरणाखालील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
आनंदवाडीचा पुल पाण्याखाली गेला आहे.
नाहुली भागातही पावसाने मोठा हाहाकार उडवला आहे. या भागातील भिलारे वस्तीवरील पुल वाहुन गेला आहे.
वस्तीचा गावाशी अंसलेला संपर्क तुटला आहे. जायभायवाडी तेलंगशी पुलावरून पाणी
वाहत आहे. यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. जवळा येथील नांदनी नदीला महापूर आलाय. मारुती मंदिराच्या जवळ पाणी आलेले असून स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे.
नदीकाठच्या लोकांनी सावध रहावे. अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वाहत आहे. अनेक पुल वाहून गेले आहेत. दरडवाडी, आनंदवाडी पुल वाहतुकीसाठी बंद आहेत, बांधखडकचा पुल वाहुन गेला तसेच नाहुली भिलारे वस्ती येथील पुल वाहून गेल्याने वस्ती व गावाचा संपर्क तुटला आहे. पीके पाण्यात आहेत. रस्ते खचले आहेत. रस्ते उखडले आहेत. वाहतूक ठप्प झाली आहे.
यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मोहरी तलावाचा सांडवा फुटला होता. तसेच आनंदवाडी, दरडवाडी पुल वाहतुकीसाठी बंद आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी घरे कोसळून नागरिक जखमी झाले आहेत. तर पशूधनही मोठ्या प्रमाणात वाया गेले आहे.
जवळा गावात तहसीलदार यांनी भेट देऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. तसेच जवळा ग्रामपंचायत प्रशासनाने आवाहन केले आहे की जवळा गावातील नांदणी नदी व सिना नदीच्या कडेला असलेल्या सर्व वस्त्या व घरे यांना सूचित करण्यात येत आहे की पाण्याचा प्रवाह वाढत आहे. गावातील मारुती मंदिर परिसर, कुंभार गल्ली, वाळुंजकर गल्ली, भीमनगर, मातंग वस्ती येथील नागरिकांची “श्री. जवळेश्वर मंदिर भक्त निवास” व “नवीन ग्रामपंचायत” येथे राहण्याची सोय केली आहे..नागरिकांनी तेथे जाऊन थांबावे.
सप्टेंबरचे अखेरचे दिवस नूकसान देणारया पावसाचे आहेत. नागरिकांनी एकमेकांच्या संपर्कात राहावे सतर्क राहावे.
गावं आपलं , गावातील सर्व माणसं आपलीच, आपल्या माणसासाठी सदैव मदतीचा हात द्या.
अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे.
सिटीझन न्युज 9423391215
