तो अनपढ शिक्षक निलंबित! आदेशात कर्तव्यात कसुर; मात्र कारणं वेगळीच : शिकवणे शुन्य , पगार पुर्ण ; कोणाच्या वशिल्यावर ?
तो अनपढ शिक्षक निलंबित!
आदेशात कर्तव्यात कसुर; मात्र कारणं वेगळीच :
शिकवणे शुन्य , पगार पुर्ण ; कोणाच्या वशिल्यावर ?
सिटीझन प्रतिनिधी
शिक्षण घेतल्याचे कागदी पुरावे आहेत .त्यानुसार शिक्षक म्हणून नोकरी मिळवली मात्र प्रत्यक्षात मुलांना शिकवता येत नाही. पगार मात्र पुर्ण घेतात. मुलांच्या शिक्षणाच्या दर्जाबाबत काळजी नाही ,सतत मोबाईलवर आँनलाईन रहाणे,शैक्षणिक कामाच्या नावाखाली शहरात येणे दिवसभर इतर उद्योग करणे.राजकारणात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग घेणे, राजकीय वरदहस्तामुळे शिक्षकी पेशाला न शोभणारे उद्योग करणे, असे जामखेड तालुक्यात अनेक शिक्षक आहेत .

त्यापैकीच जामखेड तालुक्यातील देवदैठण येथील धनगर वस्ती शाळेचे अंकुश रामराव महारनवर या सुशिक्षित अनपढ शिक्षकाचे नुकतेच तात्पुरते निलंबन करण्यात आले आहे .मात्र तात्पुरते न करता पुर्णपणे निलंबित का करण्यात आले नाही अशी विचारणा पालक व नागरिकांमधून होत आहे .
देवदैठण येथील धनगर वस्ती शाळेचे उपमुख्याध्यापक
अकुश रामराव महारनवर यांच्याबाबत पालकांनी अनेक तक्रारींचा अर्ज मुख्य कार्यकारी अधिकारी अहिल्यानगर यांना दिला होता.
.तक्रारीनुसार कर्तव्यात कसूर केल्याचा अहवाल गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती जामखेड यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्यांना सादर केला .सदर प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील ३ चा भंग केला आहे. जिल्हा परिषद अहिल्यानगर मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपिल) नियम १९६४ चे भाग-२ मधील नियम ३ अन्वये अंकुश रामराव महारनवर उपाध्यापक, जि.प.प्रा.शाळा धनगरवस्ती देवदैठण ता. जामखेड लि. अहिल्यानगर यांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले असल्याचे आदेश दिले .

सदर आदेशात म्हटले आहे की निलंबनाच्या कालावधीत अंकुश रामराव महारनवर यांचे अहिल्यानगर याचे मुख्यालय पचायत समिती श्रीगोंदा येथे राहील. गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती श्रीगोंदा यांच्या पुर्वपरवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.
तसेच अंकुश रामराव महारनवर यांना महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे याच्या काळातील प्रदाने) नियम १९८५ मधील नियम ६८ च्या तरतुदीनुसार निलबन भत्ता देण्याचे आदेश आहेत . निलंबनाच्या कालावधीत खाजगी नोकरी स्विकारू नये, त्यानी तसे केल्यास ते दोषारोप त्यांच्यावर ठेवण्यात तसेच ते निलंबन निर्वाह भत्ता गमविण्यास पात्र ठरतील, निलंबनाच्या कालावधीत निलंबन निर्वाह भत्ता जेव्हा देण्यात येईल, त्यावेळी आपण खाजगी नोकरी स्विकारली नाही अथवा कोणताही खाजगी धंदा वा व्यवसाय करीत नाही अशा आशयाचे प्रमाणपत्र अंकुश रामराय महारनवर यांना सादर करावे लागेल.
निलंबनाच्या कालावधीत अकुश रामराव महारनवर उपाध्यापक, जि.प.प्रा.शाळा धनगरवस्ती देवदैठण ता. जामखेड जि. अहिल्यानगर याना निलंबन निर्वाह भत्ता देण्याबाबतची कार्यवाही गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती श्रीगोंदा जि.अहिल्यानगर हे करतील.
सदर प्रकरणातील या शिक्षकाचा ज्या ज्या ठिकाणी सेवा काळा झाला आहे तेथेही अनेक तक्रारी आहेत .या शिक्षकाला नीट शिकवता येत नाही . सतत मोबाईल फोनवर आँनलाईन , कोणाचे ऐकत नाही ,सरकारचा बीन कामाचा पगार घेत आहे .शिक्षण विभागाने या शिक्षकाला कोणाच्या वशिल्याने बीन कामाचा दिला .शिक्षण विभागाचा काही लोचा आहे का ? अशा शिक्षकाला तात्पुरते निलंबन का केले .कायमचे नोकरीतून कमी का नाही केले.कोणाचा राजकीय हस्तक्षेप झाला असा प्रश्न पालकांमध्ये चर्चेत आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!