अंगावर घराची भिंत पडुन महिलेचा मृत्यू
पावसाने घेतळा बळी
पिंपळगाव उंडा येथील दूर्दैवी घटना
जामखेड प्रतिनिधी
सध्या जामखेड तालुक्यात सर्वत्र जोरदार रात्रभर पावसाचा तडाखा चालूच आहे.
तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथे पारुबाई किसन गव्हाणे वय ७५ यांच्या अंगावर घराची भींत पडून मृत्यू झाल्याची दूर्दैवी घटना घडली आहे.
रात्री 11:30 किसन गव्हाणे व पारूबाई किसन गव्हाणे पती पत्नी आपल्या पत्र्याच्या घरात ब झोपले होते. सतत पाऊस चालू असल्याने शेजारच्या जून्या इमारतीचा भीतीचा भाग त्यांच्या पत्र्याच्या घरावर कोसळला.
त्यात मयत पारूबाई मोठ्ठ्या मोठ्या प्रमाणावर जख्मी झाल्या त्यांना तातडीने कोसळली 12:00 वाजता जामखेड येथील समर्थ हॉस्पिटलला उपचारासाठी आणले असता त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले.त्यांनंतर ग्रामीण रुग्णालयात डॉ शशिकांत शिंदे यांनी रात्रीच शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. दरम्यान गणेश जगताप यांनी घटनेची माहिती सर्कल इकडे मँडमला दिली तलाठी विकास मोराळे व सर्कल इकडे मँडम हे तातडीने दवाखान्यात पोहचले घटनेची माहिती घेतली व
तहसीलदार पांडूळे यांना कळविले.
सदर वेळ पावसाची नूकासान देणारी आहे. सर्वांनी एकमेकांच्या संपर्कात राहण्याची गरज आहे.
सतर्क राहून एकमेकांना मदत करण्याची गरज आहे. 
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
