अजित पवारांचे ‘ते’ वक्तव्य शिळ्या कढीला ऊत आणण्यासाठी :- सभापती राम शिंदे
अजितदादा दिलखुलास… राम शिंदेही समंजस :- नेत्यांची सारवासारव
जामखेड प्रतिनिधी
भावकीचा विचार केला नसता तर तू आमदार झाला नसतास, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आ रोहित पवार यांना उद्देशून केलेल्या या वक्तव्यानंतर सभापती प्रा राम शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
अजित पवार यांनी वारंवार अशा वक्तव्यांद्वारे शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रयत्न केला आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात माझ्या पराभवामागे पवार कुटुंबातील अघोषित करार आणि नियोजित कटच होता असा आरोप करत प्रा राम शिंदे यांनी अजित पवारांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
कर्जत-जामखेडमधील
पराभवानंतर विधानपरिषदेचे सभापती आ. राम शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवारांनी रोहित पवारांना आमदार बनवण्यासाठी मदत केल्याचा आरोप करत, शिंदे यांनी या ‘भावकी’च्या राजकारणामुळेच आपला पराभव झाल्याचा दावा केला.
एवढेच नव्हे तर अजित पवार हे महायुतीत असूनही वारंवार रोहित पवारांना केलेल्या मदतीच्या चुकीच्या कृत्याचा उल्लेख करीत आपल्याला टॉर्चरच करीत असल्याची टीका केली आहे. याबाबत अजितदादांना भाजप नेतृत्वाने समज द्यावी, अशीही त्यांनी मागणी केली आहे.
विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागलेले भाजप नेते आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना उद्देशून केलेल्या भावकीचा विचार केला नसता तर तू आमदार झाला नसतास, या वक्तव्यानंतर शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
राम शिंदे यांनी दावा केला की, अजित पवार यांचे हे वक्तव्य म्हणजे मला सातत्याने टॉर्चर करण्याचा प्रयत्न आहे. वास्तविक तो काळा इतिहास आहे. राष्ट्रवादीच्या त्यांच्या कार्यकर्त्यांना विरोधी शरद पवार गटाच्या रोहित पवारांना मदत करण्याच्या सूचना दिल्या.
राम शिंदे म्हणाले की, अजित पवार यांनी वारंवार अशा वक्तव्यांद्वारे शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रयत्न केला आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात माझ्या पराभवामागे पवार कुटुंबातील अघोषित करार आणि नियोजित कटच होता.

—अजितदादांना दिलखुलास… राम शिंदेही समंजस :
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दिलखुलास व्यक्तीमत्व आहे, आत एक, बाहेर एक असे त्यांचे नसते. जे करायचे ते खुलेआम करतात, मनात आहे ते बोलून जातात. त्यानुसारच अजितदादा ‘भावकी’ तूनच कर्जत-जामखेड मतदारसंघात लक्ष न घातल्याने पुतण्या रोहित पवार निवडून आल्याचे वारंवार उल्लेख केला. सभापती राम शिंदे यांना टोचणे स्वाभाविक आहे. पण आ. रोहित पवारांना काकाच्या उपकाराची जाण नाही. ते वारंवार अजितदादांवर टीका करण्याचा नसता उद्योग करीत असल्याने त्यांना दम देण्यासाठीच अजितदादांनी खडे बोल सुनावले. रोहित पवारांना कसे निवडून आणले याची जाणीव करून दिली. अर्थात राम शिंदे यांना हे टोचणे स्वाभाविक आहे. पण ते समंजस, सूज्ञ आहेत. तेही अशा बाबतीत खुन्नस ठेवून राहणार नाहीत. किंवा तक्रारी करत बसणार नाहीत.
पवारांनी महायुतीचा धर्म पाळला नाही आणि त्यांना सभेसाठी बोलावूनही ते आले नाहीत. यामुळे त्यांचा पराभव १ हजार २४३ मतांनी रोहित पवार यांच्याकडून झाला, असा दावा शिंदे यांनी केला आहे. आता झाले गेले जावू द्या, किमान यापुढे तरी असे वागू नये, याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना योग्य निर्णय घेण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर इथं झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात पवार काका-पुतण्यात जुगलबंदी रंगली होती. मी भावकीकडं लक्ष दिलं, त्यामुळे तू आमदार झालास. जयंतराव त्याला विचारा की किती मतं पडली आहेत, आपण पोस्टल
बॅलेटमध्ये निवडून आला आहे. त्यामुळे माझ्या कुणी नादाला लागू नका, असं अजित पवारांनी म्हटलं होतं. दरम्यान, अजित पवारांचे वक्तव्य आणि राम शिंदे यांचे त्याला प्रत्युत्तर या आरोप-प्रत्यारोपांमुळे महायुतीत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. राम शिंदे यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करताना, अजित पवार यांच्या भूमिकेमुळे महायुतीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी मात्र अजित पवारांना तसे म्हणायचे नव्हते. शिंदे यांचा गैरसमज झाल्याचा दावा केला आहे. पण यातून महायुतीतील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा समोर आला आहे.आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215