Homeव्हिडिओ बातम्यासभापती प्रा राम शिंदे व त्यांच्या आईची शोसलमिडीयावर बदनामी : माथेफिरूवर कारवाईची...

सभापती प्रा राम शिंदे व त्यांच्या आईची शोसलमिडीयावर बदनामी : माथेफिरूवर कारवाईची मागणी :जामखेड भाजपाचे पोलीसांना निवेदन:

सभापती प्रा. राम शिंदे व त्यांच्या:आईची शोसलमिडीयावर बदनामी :

माथेफिरू विरोधात कारवाईची मागणी

जामखेड भाजपचे पोलिसांकडे निवेदन

 

जामखेड प्रतिनिधी

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या वक्तव्याची मोडतोड करून एका वर्तमानपत्राने चुकीचे वृत्त प्रसिद्ध केले. त्याच वृत्ताच्या आधाराने सोशल मीडियावर घृणास्पद, अश्लाघ्य आणि अपमानास्पद पोस्ट लिहिणाऱ्या संदीप पाटील या माथेफिरू व्यक्तीविरोधात जामखेड भाजप आक्रमक झाली आहे. याबाबत कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आज (दि. 21 ऑगस्ट) भाजपच्या शिष्टमंडळाने जामखेड पोलिस स्टेशनला दिलेल्या निवेदनातून केली आहे.

माहितीनुसार, प्रा. राम शिंदे यांनी नुकत्याच कर्जत येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात “एक देश में दोन निशाण नहीं चलेंगे” हा भारतीय जनता पक्षाचा काश्मीरविषयी ठाम आणि राष्ट्रीय विचार मांडला होता. मात्र या विधानाची मोडतोड करून एका दैनिकाने वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर संदीप पाटील या व्यक्तीने सोशल मीडियावर प्रा. राम शिंदे व त्यांच्या मातोश्रींविषयी अश्लाघ्य, अमानुष आणि मानवतेला काळिमा फासणारे वक्तव्य केल्याचा प्रकार समोर आला.

या प्रकारामुळे शिंदे समर्थक कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “या वक्तव्यामुळे केवळ आमचे नेते राम शिंदे यांचीच नव्हे तर विधानपरिषदेच्या प्रतिष्ठित खुर्चीचीही बदनामी झाली आहे. त्यामुळे संदीप पाटीलवर कडक कायदेशीर कारवाई केली नाही तर भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील,” असा इशारा शहर भाजप मंडळ अध्यक्ष संजय (काका) काशीद यांनी दिला.

यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांनी भाजप शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारले. यावेळी भाजप नेते प्रा. मधुकर (आबा) राळेभात, पंचायत समितीचे माजी उपसभापती रविंद्र सुरवसे, जिल्हा उपाध्यक्ष अजय काशीद, मार्केट समिती सभापती शरद कार्ले, उपसभापती नंदकुमार गोरे, संचालक डाॅ. गणेश जगताप, संचालक नारायण जायभाय, संचालक विष्णू भोंडवे, तसेच मनोज कुलकर्णी, प्रविण बोलभट, उध्दव हुलगुंडे, प्रा. संजय राऊत, विठ्ठल राळेभात, सुभाष जायभाय यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!