जनहिताचा आव आणणाऱ्यांनी स्वतःच्या कार्याचा हिशोब जनतेला द्यावा विकासासाठी नव्हे स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी उपोषण शहाजी राजेभोसले यांच्या नान्नज विकासासाठी च्या उपोषणावर संतोष पवारांची टीका .
शहाजी राजेभोसले यांच्या नान्नज विकासासाठी च्या उपोषणावर संतोष पवारांची टीका .
संतोष पवार यांनी म्हटले आहे की, भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला आंदोलन आणि उपोषण करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र, जनहिताचा आव आणणाऱ्यांनी प्रथम स्वतःच्या कार्याचा आणि भूमिकेचा हिशेब जनतेसमोर मांडावा. अनेक वर्षे गावातील विविध प्रश्नांबाबत त्यांनी नेमके कोणते पाठपुरावे केले, कोणत्या शासकीय कार्यालयात निवेदने दिली आणि त्यातून काय निष्पन्न झाले, हे स्पष्ट करावे.
पत्रकात त्यांनी पुढे नमूद केले की, गावातील तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी अनुपस्थिती, शासकीय कार्यालयांतील अनियमितता, तसेच शाळांमधील कथित गैरव्यवहार यांसारख्या गंभीर प्रश्नांवर राजेभोसले यांनी यापूर्वी कधी आवाज उठवला का, याचे उत्तर जनतेला द्यावे.
याशिवाय, विविध शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची होणारी गैरसोय, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करण्याऐवजी निवडक मुद्द्यांवर आंदोलन करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही संतोष पवार यांनी केला आहे.
पत्रकाच्या शेवटी त्यांनी राजेभोसले यांना आवाहन करत म्हटले आहे की, गावाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करायचे असेल तर सर्व संबंधित प्रश्नांवर वस्तुनिष्ठ भूमिका घ्यावी. केवळ प्रसिद्धीसाठी किंवा राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आंदोलन करण्यापेक्षा जनतेच्या हितासाठी सातत्याने काम करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
RELATED ARTICLES






प्रतिनिधी यासीन शेख 9423391215