Homeव्हिडिओ बातम्यानान्नज गाव दि ९ आँगस्ट रोजी बंद .विविध विकास कामांसाठी शहाजीराजे भोसलेंच्या...
नान्नज गाव दि ९ आँगस्ट रोजी बंद .विविध विकास कामांसाठी शहाजीराजे भोसलेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस
विकास कामांच्या मागण्यांसाठी नान्नज गाव दि ९ आँगस्ट रोजी बंद
शहाजीराजे यांचा उपोषणाचा दुसरा दिवस ; ग्रामस्थांचाही सहभाग
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील नान्नज येथील काँग्रेसचे ता.अध्यक्ष शहाजी राजेभोसले यांचा उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असुन उद्या रविवार दि. ९रोजी नान्नज गाव ग्रामस्थांच्या वतीने कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे प्रलंबित मागण्यांसाठी कायदेशीर मार्गाने उपोषणास बसलेले शहाजी राजेभोसले यांच्या उपोषणास जाहीर पाठिंबा म्हणून नान्नज गाव उद्या कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे.
उपोषणकर्ते राजेभोसले यांनी मांडलेल्या मागण्या अत्यंत रास्त व जनहिताच्या आहे प्रशासनाने त्यांच्या प्रकृतीचा व जनभावनेचा विचार करून या मागण्याची गांभीर्याने दखल घ्यावी व त्यावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा ही नान्नज गावातील सर्व नागरिकांचे म्हणणे आहे मागण्यांवर त्वरित तोडगा न निघाल्यास उद्या रविवार दि. ९ रोजी नान्नज गाव कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे गाव बंद ठेऊन ही तोडगा निघाला नाही तर नंतर जामखेड – करमाळा रोडवर रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
प्रशासनाने या सर्व मागण्यांची वेळेत दखल घ्यावी हे आमरण उपोषण अधिक तीव्र स्वरूपात छेडले जाईल, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!