Homeव्हिडिओ बातम्याजनहिताचा आव आणणाऱ्यांनी स्वतःच्या कार्याचा हिशोब जनतेला द्यावा विकासासाठी नव्हे...

जनहिताचा आव आणणाऱ्यांनी स्वतःच्या कार्याचा हिशोब जनतेला द्यावा विकासासाठी नव्हे स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी उपोषण शहाजी राजेभोसले यांच्या नान्नज विकासासाठी च्या उपोषणावर संतोष पवारांची टीका .

जनहिताचा आव आणणाऱ्यांनी स्वतःच्या कार्याचा हिशोब जनतेला द्यावा

विकासासाठी नव्हे स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी उपोषण

शहाजी राजेभोसले यांच्या नान्नज विकासासाठी च्या उपोषणावर संतोष पवारांची टीका .
जामखेड प्रतिनिधी
जनहिताचा आव आणणाऱ्यांनी प्रथम स्वतःच्या कार्याचा आणि भूमिकेचा हिशेब जनतेसमोर मांडावा. अनेक वर्षे गावातील विविध प्रश्नांबाबत त्यांनी नेमके कोणते पाठपुरावे केले, कोणत्या शासकीय कार्यालयात निवेदने दिली .कीती कशासाठी अंदोलन उपोषण केले आणि त्यातून काय निष्पन्न झाले, हे स्पष्ट करावे. नान्नजच्या विकासासाठी शहाजी राजे भोसले यांच्या सुरू असलेल्या उपोषणावर असे माजी सरपंच संतोष पवार यांनी पत्रकाद्वारे टीकास्त्र सोडले आहे .

नान्नज येथील विविध मागण्यांसाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजी राजेभोसले यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणावर माजी सरपंच संतोष पवार यांनी सविस्तर पत्रकाद्वारे टीका केली आहे. राजेभोसले यांचे उपोषण हे नान्नजच्या विकासासाठी नसून स्वतःची प्रसिद्धी आणि राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

संतोष पवार यांनी म्हटले आहे की, भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला आंदोलन आणि उपोषण करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र, जनहिताचा आव आणणाऱ्यांनी प्रथम स्वतःच्या कार्याचा आणि भूमिकेचा हिशेब जनतेसमोर मांडावा. अनेक वर्षे गावातील विविध प्रश्नांबाबत त्यांनी नेमके कोणते पाठपुरावे केले, कोणत्या शासकीय कार्यालयात निवेदने दिली आणि त्यातून काय निष्पन्न झाले, हे स्पष्ट करावे.
पवार यांनी पत्रकात आरोप केला आहे की, गावातील बसस्थानक, रस्ते, नदीवरील बंधारा, राष्ट्रीयीकृत बँक, तसेच इतर विकासकामांबाबत आज आंदोलन करणाऱ्यांनी यापूर्वी काय प्रयत्न केले, याची माहिती जनतेला देणे आवश्यक आहे. तसेच शासकीय जागेवरील अतिक्रमणासारख्या विषयांवरही त्यांनी भूमिका स्पष्ट करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

पत्रकात त्यांनी पुढे नमूद केले की, गावातील तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी अनुपस्थिती, शासकीय कार्यालयांतील अनियमितता, तसेच शाळांमधील कथित गैरव्यवहार यांसारख्या गंभीर प्रश्नांवर राजेभोसले यांनी यापूर्वी कधी आवाज उठवला का, याचे उत्तर जनतेला द्यावे.

याशिवाय, विविध शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची होणारी गैरसोय, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करण्याऐवजी निवडक मुद्द्यांवर आंदोलन करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही संतोष पवार यांनी केला आहे.

पत्रकाच्या शेवटी त्यांनी राजेभोसले यांना आवाहन करत म्हटले आहे की, गावाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करायचे असेल तर सर्व संबंधित प्रश्नांवर वस्तुनिष्ठ भूमिका घ्यावी. केवळ प्रसिद्धीसाठी किंवा राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आंदोलन करण्यापेक्षा जनतेच्या हितासाठी सातत्याने काम करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, या आरोपांवर शहाजी राजेभोसले यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यांची प्रतिक्रिया प्राप्त झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!