Homeव्हिडिओ बातम्यानान्नज च्या विकासाचे विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी शहाजी राजे भोसलेंचे उपोषण सुरू.ग्रामस्थांचा...
नान्नज च्या विकासाचे विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी शहाजी राजे भोसलेंचे उपोषण सुरू.ग्रामस्थांचा पाठींबा .रास्ता रोको आंदोलन व गाव बंदचा इशारा
नान्नज च्या विकासाचे विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शहाजी राजेभोसले यांचे उपोषण :
ग्रामस्थांचा पाठींबा
रास्ता रोको आंदोलन व गाव बंदचा इशारा
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील नान्नज गावच्या विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत .त्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी काँग्रेसचे ता.अध्यक्ष शहाजी राजेभोसले यांनी नान्नज येथे उपोषण सुरू केले आहे .ग्रामस्थांचा ही पाठींबा मिळत आहे .नवीन बसस्थानक उभारण्यात यावे व राष्ट्रीयीकृत बँक शाखेची स्थापना करण्यात यावी या सह ७ विविध प्रकारच्या मागण्या साठी नान्नज बाजारतळ येथे आमरण उपोषण सुरू झाले आहे.
नान्नज शहर हे जामखेड तालुक्यातील मोठी बाजार पेठ असुन येथे सुमारे ७ ते ८ हजार लोकसंख्येचे महत्त्वाचे गाव असून परिसरातील १२ ते १३ गावे शैक्षणिक, वैद्यकीय व दैनंदिन व्यवहारासाठी नान्नजवर पूर्णपणे अवलंबून आहेत. मात्र, नागरी सुविधांचा प्रचंड अभाव व रस्त्यांची झालेली दुरवस्था यांमुळे संपूर्ण परिसराचा विकास खुंटला आहे. त्यामुळे नान्नज येथे पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह व आसनव्यवस्था असलेले सुसज्ज बसस्थानक उभारण्यात यावे, तसेच शेतकरी, लहान व्यापारी, वृद्ध व तरुणांच्या सोयीसाठी ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ किंवा ‘बँक ऑफ महाराष्ट्र’सारख्या राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करण्यात यावी
, अशा मागण्या साठी कॉंग्रेस चे ता.अध्यक्ष शहाजीराजे भोसले हे नान्नजला आज पासून दि. ७/८/२०२६ रोजी पासुन बाजारतळ येथे उपोषणास बसले आहेत
शहाजीराजे भोसले यांच्या मागण्या शासनाने मान्यता केल्या नाही तर नान्नज गाव बंद करून नान्नज मध्ये जामखेड करमाळा रोड वर रस्तारोको आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
प्रशासनाने या मागण्यांची वेळेत दखल घ्यावी अन्यथा आमरण उपोषण अधिक तीव्र स्वरूपात छेडले जाईल, तसेच रास्ता रोको आंदोलन व गाव बंदचा ही इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!