Homeव्हिडिओ बातम्यादिंडीला गेली अन् परत नाही आली.दरडवाडी येथील २४ वर्षीय महिला हरवली .खर्डा...

दिंडीला गेली अन् परत नाही आली.दरडवाडी येथील २४ वर्षीय महिला हरवली .खर्डा पोलीसात मिसीग दाखर

दिंडीला गेली अन् परत नाही आली

दरडवाडी येथील २४ वर्षीय महिला हरवली ??

खर्डा पोलीसात मिसिंग दाखल

जामखेड प्रतिनिधी

दिंडीला गेली मात्र परत नाही आली .पतीने पोलीसात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार केली .
२४ वर्षे वय असलेली महिला बेपत्ता झाली असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे .

जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील दरडवाडी येथील रहिवासी अंकुश लक्ष्मण दराडे (वय ३५) यांनी खर्डा पोलीस ठाण्यात दिनांक 30 जुलै रोजी हरवणाऱ्या पत्नीविषयी हरवल्याची तक्रार नोंदविली आहे .

बेपत्ता महिलेच्या पतीच्या तक्रारीनुसार पत्नी पायल अंकुश दराडे (वय २४) दिनांक ७ जून २०२६ रोजी सुमारे रात्री ९ वाजता घरातून निघून गेली आणि तेव्हापासून परत आलेली नाही.
याबाबत अंकुश दराडे यांनी सांगितले की ते ०७/०६/२०२६ रोजी घरी परतल्यावर घराचे बाह्य दार कडीने बंद होते व आत मुलगी रडत होती.
दार उघडल्यावर मोठी मुलगी आरुषी रडताना दिसली, परंतु पत्नी पायल न सापडल्यामुळे त्यांनी आजूबाजूला शोध घेतला. नातेवाईक, संबंधित कुटुंबीय व सासऱ्यांना विचारले असता सासऱ्यांनी पायल पंढरपूरच्या दिंडीला गेलेली असावी असे सांगितले, पण तिथे आणि अन्य ठिकाणी शोध घेतला असता तिचा काहीही ठावठीक मिळाला नाही .

हरवलेल्या पायलचे वर्णन तपशील:

वय २४ वर्षे, उंची सुमारे १५० से.मी., रंग सावळा, सडपातळ शारीरिक बांधणी, काळे केस, नाक सरळ आणि चेहरा उभा.
शेवटच्या वेळी ती गावठी परिधानात होती व पायात पांढऱ्या रंगाचे चप्पल (सँडल) असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

अंकुश दराडे यांनी ही मिसिंग तक्रार खर्डा पोलीस ठाण्यात सादर केली आहे आणि त्यांनी लोकांना व पोलीसांना पायलविषयी कोणतीही माहिती असल्यास तातडीने कळवण्याची विनंती केली आहे.
पुढील तपास खर्डा पोलीस करीत आहेत.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!