Homeव्हिडिओ बातम्यापोलिसांनी पटवली चुकीची ओळख ; निरपराध वृद्धाला ८८ दिवस जेलमध्ये डांबले: ...

पोलिसांनी पटवली चुकीची ओळख ; निरपराध वृद्धाला ८८ दिवस जेलमध्ये डांबले: आरोपी शेखर पटेल पण तुरूंगात डांबले इकबाल अलीला आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नामुळे सुटका ; जामखेडचे सूरेश परकड झाले जामीन पोलिसांच्या कार्यपद्धतीवर न्यायालयाने केले गंभीर प्रश्न

पोलिसांनी पटवली चुकीची ओळख ; निरपराध वृद्धाला ८८ दिवस जेलमध्ये डांबले:

आरोपी शेखर पटेल पण तुरूंगात डांबले इकबाल अलीला

आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नामुळे सुटका ; जामखेडचे सूरेश परकड झाले जामीन

न्यायालयाने पोलीसांच्या कार्यपद्धतीवर केले गंभीर प्रश्न
जामखेड प्रतिनिधी
शंभर अपराधी सुटले तरी चालेल पण एका निरापधाराला शिक्षा नको ! असे सुचक विधान आहे .मात्र
सध्या पोलीस प्रशासनाकडुन जाणतेपणी अनेक गंभीर चुका केल्या जात आहेत त्याची शिक्षा निरापधाराला होत आहे .लोणावळा पोलीसांची अशीच
गंभीर चूक उघडकीस आली आहे .आरोपी दुसराच, तुरुंगात भलत्याच निरपराध व्यक्तीला डांबून ठेवले अशा
या गंभीर प्रकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहीत पवार यांनी पोलिस महासंचालक यांची भेट घेऊन पोलिसांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी निवेदन दिले आहे .

याप्रकरणात आमदार रोहीत  पवार यांच्यासह पक्षाचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे व अहिल्यानगर, जामखेड तालुक्यातील लोणी गावचे सुपुत्र सुरेश वैजिनाथ परकड उपाध्यक्ष खडकवासला विधानसभा मतदारसंघ हे पाठपुरावा करत आहेत.
लोणावळा शहर पोलिसांनी तपासात अत्यंत निष्काळजीपणा दाखवत एका ६६ वर्षीय निरपराध वृद्धाला चुकीच्या ओळखीवरून तब्बल ८८ दिवस तुरुंगात
डांबल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे .शेखर पटेल या आरोपीच्या जागी चुकीची ओळख पटवून
६६ वर्षीय इक्बाल मुमताज अली जाफरी यांना अटक करून त्यांच्यावर गंभीर अन्याय करण्यात आला. याप्रकरणी दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे राज्य प्रवक्ते विकास लवांडे यांनी पत्रकार परिषदेत केली.

लोणावळा शहर पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात शेखर पटेल नावाचा आरोपी हवा होता. कोणतीही शहानिशा न करता पोलिसांनी जाफरी यांनाच शेखर पटेल समजून अटक केली. नावात, वयात वा कागदपत्रांत कोणतेही साम्य नसतांना आणि मी शेखर पटेल नाही असे वारंवार जाफरी यांनी सांगूनही त्यांना ८८ दिवस येरवडा मध्यवर्ती कारागृहात राहावे लागले. अखेर १७ जून २०२६ रोजी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

विशेष म्हणजे जामखेड तालुक्यातील लोणी येथील सुरेश परकड हे इक्बाल मुमताज अली यांना कोर्टात जामीन झाले आहेत .

हा प्रकार राज्यघटनेच्या अनुच्छेद २१ मधील वैयक्ति क स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन आहे. त्यामुळे तत्कालीन तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्यासह जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर फौजदारी कारवाई करावी व पीडित वृद्धास नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी अँड मिलिंद पवार, ॲड . अनिकेत जांभूळकर आणि विकास लवांडे यांनी केली आहे.

अशा प्रकारे अनेक ठिकाणी पोलिसांच्या बेजबाबदारपणाचा त्रास अनेक निरापध लोकांना होत आहे.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 . 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!