दिंडीला गेली मात्र परत नाही आली .पतीने पोलीसात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार केली .
२४ वर्षे वय असलेली महिला बेपत्ता झाली असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे .
जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील दरडवाडी येथील रहिवासी अंकुश लक्ष्मण दराडे (वय ३५) यांनी खर्डा पोलीस ठाण्यात दिनांक 30 जुलै रोजी हरवणाऱ्या पत्नीविषयी हरवल्याची तक्रार नोंदविली आहे .
बेपत्ता महिलेच्या पतीच्या तक्रारीनुसार पत्नी पायल अंकुश दराडे (वय २४) दिनांक ७ जून २०२६ रोजी सुमारे रात्री ९ वाजता घरातून निघून गेली आणि तेव्हापासून परत आलेली नाही.
याबाबत अंकुश दराडे यांनी सांगितले की ते ०७/०६/२०२६ रोजी घरी परतल्यावर घराचे बाह्य दार कडीने बंद होते व आत मुलगी रडत होती.
दार उघडल्यावर मोठी मुलगी आरुषी रडताना दिसली, परंतु पत्नी पायल न सापडल्यामुळे त्यांनी आजूबाजूला शोध घेतला. नातेवाईक, संबंधित कुटुंबीय व सासऱ्यांना विचारले असता सासऱ्यांनी पायल पंढरपूरच्या दिंडीला गेलेली असावी असे सांगितले, पण तिथे आणि अन्य ठिकाणी शोध घेतला असता तिचा काहीही ठावठीक मिळाला नाही .
हरवलेल्या पायलचे वर्णन तपशील:
वय २४ वर्षे, उंची सुमारे १५० से.मी., रंग सावळा, सडपातळ शारीरिक बांधणी, काळे केस, नाक सरळ आणि चेहरा उभा.
शेवटच्या वेळी ती गावठी परिधानात होती व पायात पांढऱ्या रंगाचे चप्पल (सँडल) असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
अंकुश दराडे यांनी ही मिसिंग तक्रार खर्डा पोलीस ठाण्यात सादर केली आहे आणि त्यांनी लोकांना व पोलीसांना पायलविषयी कोणतीही माहिती असल्यास तातडीने कळवण्याची विनंती केली आहे.
पुढील तपास खर्डा पोलीस करीत आहेत.