Homeव्हिडिओ बातम्याजात धर्म पंथाच्या पलिकडे मैत्रीचे नाते.किडनी विकाराने त्रस्त स्वच्छतादुताला केली सवंगड्यांनी मदत

जात धर्म पंथाच्या पलिकडे मैत्रीचे नाते.किडनी विकाराने त्रस्त स्वच्छतादुताला केली सवंगड्यांनी मदत

 

 

जात, धर्म आणि पंथाच्या पलीकडे मैत्रीचे नाते !

किडनी विकाराने त्रस्त स्वच्छतादुताला केली संवगड्यांनी आर्थिक मदत:

जामखेड प्रतिनिधी

 आपला सहकारी मागील काही दिवसांपासून श्रमदानासाठी का येत नाही? याची चर्चा इतर सहकाऱ्यांमध्ये घडते. अत्यंत गरीब कुटुंबातील तो सहकारी त्याच्याकडे ना फोन, ना लँडलाईन. मग शेजारी असलेल्या मित्राला खबरबात घेण्याची जबाबदारी दिली जाते.

आणि त्याच वेळी आपल्या सोबत असणाऱ्या मित्राला एका गंभीर आजाराने ग्रासल्याची माहिती मिळली. कौटुंबिक परिस्थिती सामान्य असल्याने अवघ्या काही मिनिटात त्याच्या उपचारासाठी मोठी रक्कम उभारण्याची मोहीम यशस्वीपणे पार पडते. सहकाऱ्याचे हे मित्रप्रेम पाहून तो भावूक झालाच पण त्याचे नातेवाईकांसह मित्र-परिवार देखील या अनपेक्षित मदतीने गहिवरले.

रज्जाक तैनूर पठाण हा कर्जतच्या सर्व सामाजिक संघटनेचा कार्यकर्ता. मागील पाच वर्षांपासून ही संघटना वृक्षसंवर्धनात क्रांती घडवत आपले अखंड श्रमदान आजमितीस पार पाडत आहे. रज्जाक हा आपले योगदान देत आहे. वास्तविक पाहता तो ज्या ठिकाणी श्रमदान असते. त्या ठिकाणी ताशाच्या निनादातून पर्यावरण संवर्धनाच्या कार्याचा जागर करत असतो. यासह श्रमदानात देखील सहभागी होतो. मागील काही दिवसांपासून तो गैरहजर राहत असल्याने त्याची उणीव सहकारी मित्रांना त्रांना जाणवली.

तो अशिक्षित मोबाईल देखील वापरता येत नसल्याने त्याची चौकशी कशी करावी हा प्रश्न सहकारी मित्रांसमोर उभा राहिला. त्याची अधिक चौकशी केली असता त्यास एका गंभीर आजाराने ग्रासल्याने प्रकृती बिघडली असल्याचे समजताच सर्वच मित्रांनी तात्काळ त्याच्या घराकडे धाव घेतली. कुटुंबाची हलाखीची परिस्थिती उपचाराचा अवाजवी खर्च पाहता अवघ्या काही मिनिटातच ज्याच्या त्याच्या आर्थिक क्षमतेनुसार सहकाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने मोठी रक्कम जमा करीत मदतीचा हात पुढे केला. यावरच ते न थांबता त्यांनी संबंधित उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेतरज्जाकची प्रकृती आणि त्याच्या आजारांविषयी माहिती घेत त्यांच्या कुटुंबास देखील मानसिक आधार दिला.

शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर रज्जाक पठाण घरी सुखरूप परतला. त्यावेळी त्याच्या सहकाऱ्यांनी त्याची घरी जाऊन आस्थेवाईकपणे विचारपुस केली. त्यावेळी एकमेकाना पाहत काहींनी आपल्या आनंदाश्रूना वाट देखील मोकळी करून दिली.

——————-

हा पुनर्जन्म माझ्या सहकाऱ्यांमुळेच -रज्जाक पठाण

——————

मला अचानक त्रास झाला आणि प्रकृती अस्वस्थ असल्याने मी श्रमदानास जाऊ शकलो नाही. मात्र या सहकाऱ्यांनी मला शोधत या मरणासन्न अवस्थेत खूप मोलाची मदत दिली. या काळात नक्कीच कुटुंबाला देखील मानसिक आणि आर्थिक आधार या सर्व सहकाऱ्यांमुळे मिळाला. आम्ही एक कुटुंबासारखेच सर्व श्रमप्रेमीं राहत असून त्याची प्रचिती देखील माझ्या सारख्या गरिबाला मिळाली. रज्जाक अशिक्षित असल्याने त्याची जन्मतारीख देखील माहित नव्हती. यावर्षी रज्जाकचा पहिला वाढदिवस ५६ व्या वर्षी सर्व सामाजिक संघटनेने साजरा केला.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!