Homeव्हिडिओ बातम्यादिघोळ वनविभाग परिसरात बेवारस आढळल्या दुग्धजन्य पावडर गोण्या .भेसळ कारवाई भीतीने टाकल्या...
दिघोळ वनविभाग परिसरात बेवारस आढळल्या दुग्धजन्य पावडर गोण्या .भेसळ कारवाई भीतीने टाकल्या ? नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण .तेलंगशी दिघोळ माळवाडी जायभायवाडी जातेगाव या ठिकाणी आहेत दूध संकलन केंद्र .
दिघोळ वनविभाग परिसरात बेवारस आढळल्या दुग्धजन्य पावडरच्या गोण्या !
भेसळ कारवाईच्या भीतीने टाकल्याची चर्चा; पशुपालकांत चिंतेचे वातावरण
तेलंगशी, मोहरी, जायभायवाडी,माळवाडी ,दिघोळ, जातेगाव आदी ठिकाणी आहेत दूध संकलन केंद्र.
जामखेड प्रतिनिधी

अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईची भीती राज्यभरात भेसळखोरांच्या मनात चांगलीच बसली आहे .जामखेड तालुक्यातील दिघोळ-तेलंगशी रस्त्यालगत वन विभागाच्या हद्दीत अज्ञात व्यक्तींनी दुग्धजन्य पावडरसदृश पदार्थाच्या सुमारे ५० ते ६० गोण्या टाकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, शेतकरी आणि पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दि २६ जून रोजी शेतकऱ्याला वनविभागाच्या जागेत दुग्धजन्य पदार्थ बनविण्यासाठी वापरात येणारया पावडरच्या ५०-६० गोवण्याचा साठा दिसला .त्या शेतकऱ्याने सरपंच दशरथ राजगुरू यांना कळविले.
.सरपंचांनी आपल्या काही सहकार्यांसह सदर ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहीले .सदर साठा रात्रीच्या वेळी तेथे टाकण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. सरपंच दशरथ राजगुरू यांनी सदर माहिती ताबडतोब खर्डा पोलिस स्टेशन व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितली.
त्यानंतर खर्डा पोलीस व वन आधिकारयांनी घटनास्थळी भेट दिली.
सदर ठिकाणच्या परिसरात दिघोळ ,तेलंगशी, मोहरी, जायभायवाडी, माळवाडी ,जातेगाव आदी ठिकाणी आहेत दूध संकलन केंद्र आहेत.
राज्यात सध्या अन्न भेसळीवि रोधात कठोर मोहीम सुरू आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कारवाईच्या भीतीने हा दुग्धजन्य साठा येथे आणून टाकला असावा, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, या दाव्याला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नसून तपासानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, या गोण्यांमधील पदार्थ, नेमका कोणता आहे, तो निकृष्ट, भेसळयुक्त किंवा वापरास अयोग्य आहे का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी व पशुपालकांनी या पावडरचा कोणत्याही जनावरांच्या खाद्यासाठी वापर करू नये, तसेच या
पदार्थापासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या प्रकरणाची वन विभाग, अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने चौकशी करून संबंधित पदार्थाचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत, तसेच हा साठा येथे टाकणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
या प्रकारामुळे पर्यावरण। आणि जनावरांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. आद्याप त्याच ठिकाणी त्या गोण्या पडून आहेत .संबंधित प्रशासनाकडुन त्यांची लवकर विल्हेवाट लावल्याची गरज आहे .
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!