मोहा परिसरातील बेकायदेशीर कला केंद्रांवर कारवाई करा ; सचिन आजबेंचे तहसीलदारांना निवेदन वेश्या व्यवसाय, मद्यविक्री व अतिक्रमणामुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याचा आरोप
मोहा परिसरातील बेकायदेशीर कला केंद्रांवर कारवाई करा ;
RELATED ARTICLES
अशी मागणी करत सचिन दत्तात्रय आजबे यांनी जामखेड तहसीलदारांना निवेदन सादर केले आहे. संबंधित कला केंद्रे निवासी व वाणिज्य परवाना न घेता शेतीच्या जागेवर बेकायदेशीररित्या सुरू असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
त्यामुळे जामखेड शहरासह परिसरातील नागरिकांच्या सामाजिक प्रतिष्ठेला बाधा पोहोचत असून वातावरण दूषित होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.जामखेड शहर व परिसर सामाजिक, शैक्षणिक आणि वाणिज्य क्षेत्रात प्रगती करत असताना अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवसायांमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शहराच्या तीन किलोमीटर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची वस्ती असून सार्वजनिक सुव्यवस्था आणि सामाजिक वातावरण अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा.
अशी मागणी अर्जदारांनी केली आहे.सदर प्रकरणाची चौकशी करून संबंधित बेकायदेशीर कला केंद्रांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.