Homeव्हिडिओ बातम्याजिल्ह्यातून हद्दपार केलेल्या सराईत गुन्हेगारांचे जामखेडमध्ये वास्तव स्थानिक गुन्हे...
जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या सराईत गुन्हेगारांचे जामखेडमध्ये वास्तव स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केले जेरबंद हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या सराईत गुन्हेगारांचे जामखेडमध्ये वास्तव
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केले जेरबंद
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
जामखेड प्रतिनिधी –
अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या दोन सराईत गुन्हेगारांचे विनापरवाना जामखेडमध्ये वास्तव्याची माहिती मिळताच शहरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जामखेड शहरातुन त्या दोघांना शिताफीने ताब्यात घेतले. ही कारवाई दिनांक ६ मे २०२६ रोजी करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जामखेड शहरात हद्दपार रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेत असताना आरळेवस्ती परिसरात दोन इसम विनापरवाना वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून सोनु कुंदन वाघमारे (वय ३४) व विक्रम भगवान डागर (वय ३७, दोघे रा. आरळेवस्ती, जामखेड) यांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान दोघांनाही अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असल्याची खात्री झाली.
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनिल रमेश अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.
दरम्यान, जिल्ह्यातून हद्दपार केलेले इसम विनापरवाना वास्तव्य करत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांच्या ०२४६२-२८६९९९ या क्रमांकावर अथवा डायल ११२ वर माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक किरणकुमार कवाडी यांनी केले आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!