Homeव्हिडिओ बातम्याजामखेड शहर अतिक्रमणबाबत बेमुदत बंद, प्रशासनाविरुद्ध सर्व पक्षीय निर्णय, गरिबांचे अतिक्रमण...
जामखेड शहर अतिक्रमणबाबत बेमुदत बंद, प्रशासनाविरुद्ध सर्व पक्षीय निर्णय, गरिबांचे अतिक्रमण काढले धनदांडग्यासमोर प्रशासन नमले?? दोन्ही आमदारांनी वेळीच दखल घेण्याची गरज
जामखेड शहर बेमुदत बंद…!
प्रशासनाविरुद्ध सर्वपक्षीय निर्णय
गरिबांचे अतिक्रमण काढले धनदांडग्यासमोर प्रशासन नमले??
दोन्ही आमदारांनी लवकर हस्तक्षेप करण्याची गरज

जामखेड प्रतिनिधी –
जामखेड शहरातील महामार्गाच्या लगतच्या अतिक्रमणाबाबत अंतिम कार्यवाही होईपर्यंत जामखेड शहर बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी दि २४ फेब्रुवारी पासुन अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले असून त्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.
सदर अतिक्रमणाबाबत अनेकवेळा लेखी निवेदन दिले. तोंडी पाठपुरावा केला मात्र प्रशासनाने कसलीही दखल घेतली नाही. गोरगरीबांचे अतिक्रमणे ताबडतोब काढले मग धनदांडग्यासमोर हे प्रशासन नमले काय?? असा सवाल उपोषण आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे. 
गेल्या दोन वर्षांपासून जामखेड शहरातील महामार्गाच्या रस्त्याचे काम रखडले आहे जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी वरील रखडलेल्या रस्त्याच्या कामाला काही मालमत्ता धारकांचे बांधकामाचे अतिक्रमणं अडथळा ठरत आहेत. विकासात बाधा ठरणारया अतिक्रमणांविरोधात दि २६ फेब्रुवारी पासुन सर्वपक्षीयांनी बेमुदत बंदची हाक दिली आहे.
शहरातील मुख्य मार्गांवरील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी वाढत असून रस्त्याच्या कामालाही मोठा विलंब होत असल्याने नागरिक, व्यापारी व वाहनचालक त्रस्त झाले आहेत.दरम्यान, मुख्याधिकारी व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी एकमेकांकडे जबाबदारी ढकलत आहेत.
ठेकेदार बिल नेमके कोणाकडून काढत आहे, असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत. आमदार रोहित पवार व सभापती प्रा राम शिंदे यांनी प्रकरणात लक्ष घालून तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे.जोपर्यंत प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत बंद मागे घेतला जाणार नसल्याचा इशारा देत सर्व व्यापारी, नागरिक व ग्रामस्थांनी आंदोलनाला पाठिंबा द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी अमित चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, नगरसेवक प्रा.विकी घायतडक,अँड अरूण जाधव, शहाजी राळेभात, अझहरभाई काझी, संभाजी राळेभात, विकास राळेभात, सोले दाजी पाटील, संभाजी मुळे, अर्जुन म्हेत्रे, गणेश आजबे, अनिल सदाफुले, बजरंग डुचे, नितीन ढेरे, मनसेचे प्रदीप टापरे, पवन राळेभात,राहुल उगले, भरत चव्हाण, सुनील जावळे, वैजीनाथ पोले यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकार यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!