नेमकं अतिक्रमण कुठय!
त्या ८-१० जणांनी महामार्गाच्या कामाला, गावाला वेठीस धरू नये.
अतिक्रमणाचे रंजक चित्र नको; तो भाग वगळता इतरत्र धास्तीचे वातावरण करू नये


रस्ता हा विकासाचा महत्त्वाचा भाग आहे. जामखेड अनेक वर्षांपासून विकासाच्या रस्त्यावाचून मागे आहे. हा प्रलंबित असलेला विकासाचा रस्ता लवकर व्हावा अशी समस्त जामखेडकरांची मनोमन इच्छा आहे. त्यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न झाले आहेत. होत आहेत. रस्त्याचे कामही मोठ्या प्रमाणावर झाले आहे. मात्र ठराविक ८-१० लोकांमुळेच शहरातील मोक्याच्या वर्दळीच्या ठिकाणी रस्त्याचे काम थांबले आहे. नगररोडकडुन खर्डा चौकापर्यंत काम झाले आहे. तसेच बीड रोड कडून सरकारी दवाखान्यापर्यत काम झाले आहे. फक्त खर्डा चौक ते सरकारी दवाखाना म्हणजे अंदाजे १००-१५० मिटर इतकेच काम थांबले आहे.
म्हणजेच अतिक्रमणे फक्त याच १००-१५० मीटरमध्ये आहेत. त्यामध्ये बहुतेक ठिकाणी दोन्ही बाजुला शासकीय जागा आहेत.उत्तर आणि दक्षिण भागात मिळुण ८-१० मालमत्ता धारक आहेत. बीड रोड कडुन ज्या पध्दतीने रस्ता काम आले आहे तसेच पुढे बीड काँर्नर ते खर्डा चौकापर्यंत रस्ता काम केले तर फारच थोड्या प्रमाणात अतिक्रमणे काढण्याची गरज पडेल. मात्र सध्या संपूर्ण शहरात अतिक्रमण आहे. बीड रोड कडून मोठ्या प्रमाणावर रस्त्याचे काम झाले आहे. बीड रोडला अतिक्रमण नाहीत तरी अवास्तव चर्चा व चित्र रंगवत आहेत. बीड रोडची अतिक्रमणे असा बोलतांना भर दिला जातोय. खरेतर मुळ अडथळा बीड रोड काँर्नरच्या त्या ८-१० मालमत्ताधारकांचेच अतिक्रमणच ठरत आहेत.
