Homeव्हिडिओ बातम्याबघता काय सामील व्हा! नम्र आवाहन, अवधूत पवार यांचे उपोषण दुसरया दिवशीही...

बघता काय सामील व्हा! नम्र आवाहन, अवधूत पवार यांचे उपोषण दुसरया दिवशीही सुरुच, प्रशासन आधिकारयांची संवेदना संपली आहे, लोकप्रतिनिधी व आमदारांची संवेदनशीलता संपली आहे का?? जामखेडकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये.

बघता काय सामील व्हा नम्र आवाहन
अवधुत यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस
प्रशासनाची संवेदनशीलता संपली आहे, लोकप्रतिनिधींचीही संपली आहे का??

जामखेडकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडथळा हा जामखेड शहर विकासाला आडथळा आहे.हा त्रास किती दिवस नागरिकांनी त्रास सहन करायचा आणि का करायचा?? रस्ता शहरविकासात समाविष्ट आहे.
याबाबत सामन्यातल्या सामान्य नागरिकाला कळत आहे. आधिकारयांची संवेदना शहराप्रती नसेल पण लोकप्रतिनिधी, दोन्ही आमदार यांची संवेदना संपली आहे का?? अतिक्रमणबाबत अवधूत पवार यांचे उपोषण हे जामखेड शहरवासीयांचे उपोषण आहे. जामखेडच्या विकासामार्गावरील खोडा दूर करण्यासाठी उपोषण आहे. मग हे शासन व प्रशासनाला का लक्षात येत नाही. याचे स्वरूप मोठे होण्याची वाट पहात आहेत का?? जामखेडच्या सार्वजनिक विकासात रस्ता महत्वाचा आहे. तेव्हा बघता काय लोकशाहीमार्गाने सामिल व्हा असे नम्र आवाहन आहे.


संबधित प्रशासनाने वेळीच उपोषणाची व रस्ता विषयाची दखल घ्यावी नसता जामखेडकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहु नये.
प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून जबाबदारीची टोलवाटोलवी होत आहे “नेमका न्याय कोणाकडे मागायचा?” दोन्ही आमदार यावर गप्प का? असा सवाल उपस्थित करत अवधुत पवार यांचे उपोषण दुसर्या दिवशीही सुरूच आहे.

अवधुत पवार यांच्या मागणीला व उपोषणाला सामाजिक राजकीय विविध स्तरातून नागरिकांचा पाठींबा मिळत आहे.

राष्ट्रीय महामार्गाचे उपविभागीय अधिकारी एस. बी. चेमटे यांनी ‘आमचा काही संबंध नाही, नगरपरिषदेने अतिक्रमण काढावेत,” अशी भूमिका घेतली. तर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी “आमची सर्व तयारी आहे; मात्र महामार्गाचे अधिकारी व ठेकेदार सहकार्य करत नाहीत,” असे स्पष्टीकरण दिले. या परस्परविरोधी भूमिकेमुळे शहराच्या विकासाला खीळ बसल्याचा आरोपनागरिकांमधुन होत आहे.
जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 548-D लगतच्या अतिक्रमण व अनियमिततेबाबत वारंवार लेखी तोंडी सांगूनही कारवाई न झाल्याने सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार हे दि २४ फेब्रुवारी रोजी आमरण उपोषणाला बसले आहेत. दि २५ रोजीही उपोषण सुरूच आहे. अवधूत पवार यांच्या मागणीला व उपोषणाला विविध सामाजिक राजकीय लोकांचा पाठिंबा मिळत आहे.

जामखेड शहरात अनेक स्वतः ला प्रतिष्ठित समजतात तसेच अनेक राजकीय पदाधिकारी यांचेच अतिक्रमणे आहेत. गोरगरीब नागरिकांवर दबाव आणून त्यांना टपऱ्या काढावयास भाग पाडले पण मोठ मोठ्या लोकांचे अतिक्रमणे तशीच आहेत विशेष म्हणजे काही लोकांनी राजकीय वजन वापरून ग्रामपंचायत असताना अतिक्रमणीत जाग्याच्या नोंदी स्वतःच्या नावे करून घेतलेल्या आहेत. त्यामुळे बीड रोड तसेच भुतवडा रोड हे अतिशय लहान झाले आहेत.

यामुळे अतिक्रमणे कधी निघणार व शहर मोकळा श्वास कधी घेणार असाच प्रश्न निर्माण झाला आहे यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व ठेकेदार यांच्या भुमीकेकडे लक्ष लागले आहे. यावेळी अनेक सामाजिक व राजकीय कार्यकर्ते यांनी अवधूत पवार यांना पाठिंबा दिला आहे. याबाबतचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांना दिलेले आहे.
निवेदनामध्ये १५ दिवसांच्या आत योग्य ती कार्यवाही न झाल्यास लोकशाही व संविधानिक मार्गाने उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र आजपर्यंत प्रत्यक्ष आणि परिणामकारक कारवाई न झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
उपोषणकर्ते अवधूत पवार यांच्या खालीलप्रमाणे मागण्या आहेत.
१. राष्ट्रीय महामार्ग क्र. 548-D लगतच्या शहरातील अतिक्रमणांवर नियमानुसार व निष्पक्ष कारवाई करावी.
२. रस्त्याच्या कामाबाबत स्वतंत्र तांत्रिक चौकशी समिती नेमावी.

३. डीपीआर, जियो-टॅगिंग नोंदी व प्रत्यक्ष मोजणीची सखोल पडताळणी करून दोषींवर कारवाई करावी.
४. महावितरणच्या विद्युत खांबांबाबत तातडीने सुरक्षिततेची उपाययोजना करावी.
५. वाहतूक कोंडीची समस्या तात्काळ मार्गी लावावी.
महामार्गाचा हा प्रश्न केवळ विकासापुरता मर्यादित नसून सार्वजनिक सुरक्षितता, वाहतूक सुरळीतता आणि प्रशासनाच्या निष्पक्षतेशी संबंधित आहे. नेहमी हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांची अतिक्रमणे हटवून पक्की बांधकामे कायम ठेवली जात असल्याचा आरोपही अवधूत पवार यांनी केला आहे.

पत्रकार यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!