Homeव्हिडिओ बातम्यादूखद घटना : आदर्श शिक्षक गोकुळ गायकवाड यांच्या मूलाचा इस्लामपूर येथे आपघाती...

दूखद घटना : आदर्श शिक्षक गोकुळ गायकवाड यांच्या मूलाचा इस्लामपूर येथे आपघाती मृत्यू : जामखेडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे

अत्यंत दुर्दैवी घटना

आदर्श शिक्षक गोकुळ गायकवाड यांच्या मूलाचा इस्लामपूर येथे आपघाती मृत्यू:

जामखेडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. 

जामखेड प्रतिनिधी

 

आदर्श शिक्षक, तसेच प्राथमिक शिक्षक बँकेच्या विकास मंडळाचे माजी विश्वस्त गोकुळ गायकवाड सर जामखेड यांचा धाकटा मुलगा अविष्कार (सोनू) गोकुळ गायकवाड यांचा इस्लामपूर येथे अपघाताने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दि ५ आँक्टोबर रोजी रस्ता अपघाताची दूर्दैवी घटना घडली यात त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते.

अविष्कार गायकवाड हा शिक्षणासाठी इस्लामपूर जि सांगली येथे होते.त्याच्या वैद्यकीय अभ्यासक्रमातील पदवीचे शेवटचे केवळ ६ महिने राहिले असतांनाच काळाने त्याच्यावर झडप घातली. अपघातात अविस्कार गायकवाड यांचा मृत्यू झाला. ही घटना गायकवाड कूटुंबियांसह जामखेड करांसाठी धक्कादायक आहे.गायकवाड सरांनी दोन्ही मुलांना अत्यंत कष्टाने, जिद्दीने शिकवले हा छोटा मुलगा सोनू लहानपणापासून अत्यंत चाणाक्ष, हुशार राहिलेला होता.

मयत अविस्कारच्या अकाली जाण्याने गोकुळ गायकवाड सरांची केवळ वैयक्तिक हानीच झाली नाही तर समाजाचेही कधीही भरून न येणारे अपरिमित नुकसान झाले आहे.

या दुर्दैवी घटनेने गायकवाड कुंटुंबावर फार मोठा आघात झाला आहे. या घटनेतून गोकुळ गायकवाड व परिवाराला सावरण्याची शक्ती ईश्वराने द्यावी हि ईश्वर चरणी प्रार्थना करत आहेत.

अविस्कार गोकुळ गायकवाड यांचा पार्थीव जामखेड आणण्यात येत आहे. त्यांचा अत्यंविधी सायंकाळी ५ वा. अमरधाम जामखेड येथे होणार आहे.

———–

रस्यावर कितीही व्यवस्थित वाहनं चालवा. मात्र समोरून काय आणि कसे येईल सांगता येत नाही. आणि कधी काय विपरित घडेल हेही सांगता येत नाही. कोणतेही वाहन चालवतांना एकमेकांची काळजी घ्या. प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!