Homeव्हिडिओ बातम्या५०० च्या ६४ बनावट नोटा : आष्टीत गून्हा दाखल :शेजारच्या तालुक्यातही खपवल्याचा...

५०० च्या ६४ बनावट नोटा : आष्टीत गून्हा दाखल :शेजारच्या तालुक्यातही खपवल्याचा संशय :पोलीसांकडून कसुन चौकशी :मोठे रँकेटची शक्यता

५०० च्या ६४ बनावट नोटा: आष्टीत गुन्हा दाखल;
शेजारच्या तालुक्यातही नोटा खपल्या ??
पोलिसांकडून कसून चौकशी, मोठ्या रॅकेटची शक्यता:

जामखेड प्रतिनिधी

बनावट नोटांचे रँकेट सतत कुठे ना कुठे सतत कार्यरत आहे. पकडला तो चोर नाही पकडला तो सिना तानके चल! असा प्रकार आहे.
पाचशेच्या एक दोन नव्हे तर तब्बल ६४ बनावट नोटा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी व्यवहारात वापरून त्या खरया असल्याच्या भासवल्या व व्यवहार आणल्या हा प्रकार आष्टी तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी आष्टी तालुक्यातीलच एकजणाविरुध्द गुन्हा दाखल झाला.

शेजारच्या तालुक्यातही अशा नोटा खपवल्याचा संशय असल्याचे बोलले जात आहे. या प्रकाराने आष्टी तालुक्यासह शेजारच्या तालूक्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान या सर्व प्रकरणाची आष्टी पोलीसांकडून कसून चौकशी सुरू असून यामध्ये मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आता या नोटा त्याच्याकडे कश्या आल्या? त्याने त्याचा वापर कुठे-कुठे केला? आणि पाचशेच्या बनावट नोटा नोटा नेमक्या आणल्या कुठून? कुठे कूठे वापरल्या?? या सर्व बाबी तपासानंतरच समोर येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

आष्टी तालुक्यातील एका इसमाने पाचशेच्या तब्बल ६४ नोटा म्हणजेच ३२ हजार रूपये व्यवहारात आणून त्या नोटा खरया असल्याचे भासवून त्याचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चलनात वापर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीसआला आहे. या प्रकरणात आष्टी पोलीस ठाण्यातील पोहेकाँ प्रविण क्षीरसागर यांच्या तक्रारीवरून प्रकाश पाराजी खाडे (२४) याच्याविरूध्द कलम १७९, १८० बीएनएस प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खाडे याने या पाचशेच्या बनावट नोटा कोठून आणल्या यामागे एखादे मोठे रँकेट आहे का? याची पोलीस चौकशी करत आहे.या प्रकारामुळे सामान्य माणसाच्या हातात पाचशेची नोट आली तरी घेऊ का नको अशी शंका येते आहे.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!