Homeव्हिडिओ बातम्याकारभारणीच्या नावाने राजकीय कारभार हाकणारे बांधव लागले कामाला :जामखेड नगरपरिषद नगरपरिषदपद जनरल...

कारभारणीच्या नावाने राजकीय कारभार हाकणारे बांधव लागले कामाला :जामखेड नगरपरिषद नगरपरिषदपद जनरल महिलेसाठी राखीव :

 

काभारणीच्या नावाने कारभार पहाणारे लागले कामाला..
जामखेड नगरपरिषद नगराध्यक्षपद जनरल प्रवर्ग महिलासाठी राखीव:

इच्छुकांच्या अंगात भिनणार सामाजिक कामांचे वारे:

जामखेड प्रतिनिधी

जामखेड नगरपरिषद नगराध्यक्ष पद ओपन महिला साठी राखीव असल्याचे आरक्षण जाहीर झाले आहे. पत्नीच्या नावावर स्वतः राजकारण, समाजकारण करणारे राजकीय बांधव लागले कामाला. जनरल महिला आरक्षण कळताच इच्छूकांनी टाक्यांची फोडून आरक्षणाचे स्वागत केले.नगरपरिषद डोळ्यासमोर काहीजण अनेक दिवसांपासून सामाजिक काम करत आहेत. काहीजण आरक्षणाची वाट पहात होते. आता सामाजिक कामांचे वारे काही राजकीय लोकांच्या अंगात भिनलेले दिसेल.

ज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि ६ आँक्टोबर रोजी मुंबईत 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असणार, यावर स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे ठरत असतात. त्यामुळे आजच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीकडे राजकीय वर्तुळातून सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. आतापर्यंत जाहीर झालेल्या सोडतीनुसार, 16 नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव असेल. तर 34 नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्षपद हे ओबीसी महिलांसाठी आणि 67 नगरपरिषदांधील नगराध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गाच्या महिलांसाठी राखीव असेल. खुल्या प्रवर्गातील महिला नगराध्यक्षपद आरक्षित असलेल्या नगरपरिषदांमध्ये जामखेड नगरपरिषदचा समावेश आहे. नगरपालिकांची प्रभाग रचना अंतिम झाली होती. मात्र, आरक्षण जाहीर झाले नसल्यामुळे इच्छुकांमध्ये धाकधूक होती. आरक्षणाच्या पहिल्या टप्प्यात राज्य सरकारने अनुसूचित जातींच्या (एससी) महिलांसाठी आरक्षित असलेल्या 17 नगरपालिकेंच्या नावाची घोषणा केली आहे.आरक्षण जाहीर होण्यास सुरुवात झाल्याने राजकीय पक्षांकडून उमेदवारी निवडीस वेग येणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी होणार की नाही याचे चित्र अजुनही स्पष्ट नाही. शिवसेना महायुती करण्यास इच्छुक आहे. मात्र, भाजपने अजुनही अपेक्षित प्रतिसाद त्यांना दिला नाही.
महायुतीचा वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होईल. त्या निर्णयाचा परिणाम स्थानिक पातळीवर कसा होईल. याकडे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
मात्र, आरक्षणाची घोषणा होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला वेग आला आहे. प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!