पावसाचा जोर
नागरिकांच्या जीवाला घोर
घराघरात नाल्यांचे पाणी
जामखेड प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. दि २० मे रोजी सायंकाळी झालेल्या जोरदार पाऊसामुळे जामखेड शहरातील रस्त्यांवरील नाल्या तुडुंब भरून वाहू लागल्या .
अनेक ठिकाणी नाल्या तुंबल्याने नाल्याचे पाणी घराघरात घूसले. तपनेश्वर गल्ली, धर्मयोध्दा चौक परिसर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसर, पोकळे वस्ती, विठ्ठल मंदिर पाठीमागील परिसर आदी भागात पावसाचे नाल्यांचे पाणी घरात शिरले.
घरातील वस्तू खराब झाल्या. दुर्गंधी येऊ लागली. यापुर्वीही अशा घटना वारंवार घडल्या. नगर परिषदेला अनेक वेळा जाऊन नागरिकांनी विनंती केली. प्रत्येक वेळी पाऊस पडला की नाल्याचे व पावसाचे पाणी घरात येते. नाल्यांतील पाणी विल्हेवाट होत नाही.
नाल्या वाहत नाहीत. ठीकठिकाणी पावसाचे पाणी काढून दिले जात नाही. त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र नगरपरिषद प्रशासनाकडून कसलीही दखल घेतली जात नाही. सध्या नगरपरिषद मध्ये प्रशासकराज आहे. त्यामुळे नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यास नगरसेवक नाहित. मूख्याधिकारी कधीच नागरिकांना भेटत नाहीत.
समस्या ऐकत नाहीत.
नागरिकांनी या समस्या कोणाला सांगायच्या. कोणाकडून सोडवणूक करायची. असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. मूख्याधिकारी यांनी नागरि मूलभूत सुविधांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
