साकत घाटात ट्रक पलटी, कीन्नर चा मुत्यू तर चालक गंभीर जखमी
महामार्ग अपुर्ण कामाचा फटका अपघात थांबेना
जामखेड प्रतिनिधी
जामखेड सौताडा महामार्गाच्या अपुर्ण कामामुळे व खराब रस्त्यामुळे वाहतूक साकत मार्गे ये जा करतात दि. १८ रोजी सकाळी अंबड जि. जालना येथून मका भरलेला बारा टायर ट्रक पुण्याच्या दिशेने चालला होता.
साकत घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक घाटात पलटी झाला. यात ट्रकच्या कीन्नर चा जागीच मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी झाला आहे.या अपघातात गाडीचा कीन्नर सुमित ताराचंद राठोड वय ३१, मुक्काम पोस्ट मठतांडा, तालुका अंबड, जिल्हा जालना याचा मृत्यू झाला असून चालक केवळ शांतीलाल चव्हाण, मठतांडा, तालुका अंबड, जिल्हा जालना हा जखमी झाला आहे.
सदर ट्रक घाटात वळणावर आला असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला यावेळी ड्रायव्हर व मदतनीस दोघांनी उड्या मारल्या यावेळी ड्रायव्हर जखमी झाला पण मदतनीस (किन्नर) यांने उडी मारली पण ट्रक त्याच्या अंगावर पडली यामुळे जाग्यावर मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी आपली रुग्णवाहिका घेऊन पोहचले.यानंतर जेसीबीच्या साहाय्याने ट्रक खालील मयत झालेला कीन्नरचा मृतदेह बाहेर काढला.
यावेळी दीपक भोरे, विशाल ढवळे, त्या ठिकाणी हरिभाऊ मुरूमकर, नय्युम पठाण, पाटोदा, काका मुरूमकर, बाबू सुपेकर, विशाल जोगदंड, अविनाश कदम, महेश मोळकर आदींनी मदत केली. 
साकत घाट अरूंद असल्याने अवजड वाहनांना टर्न बसत नाही. नेहमीच अपघात होतात. गेल्या दोन वर्षांत जवळपास दहा अपघात या घाटात झाले आहेत. त्यामुळे घाटाचे रूंदीकरण करणे आवश्यक आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
