अमित चिंतामणी संयमी दमदार व्यक्तीमत्व
पक्षाशी एकनिष्ठ प्रणाणिक लोकाभिमुख चेहरा
प्रांजलताई चिंतामणी नगराध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदार
पक्षाने सकारात्मक विचार करावा नागरिकांच्या चर्चेतुन मागणी
जामखेड प्रतिनिधी
जामखेड नगराध्यक्षपद खूल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. विकसनशील असलेल्या जामखेडचा नगराध्यक्ष कसा आसावा याबाबत नागरिकांमधून चर्चा होत आहे. यामध्ये सामाजिक, धार्मिक, सलोखा जपणारे व्यक्तिमत्व म्हणजे नगरसेवक तथा प्रसिध्द व्यापारी अमित चिंतामणी होय! आपल्या स्वभावाने व कामाने लोकाभिमुख झालेला चेहरा म्हणजे अमित चिंतामणी होय! सभापती प्रा राम शिंदे यांच्याशी एकनिष्ठ राहून पक्षाचे प्रामाणिकपणे काम करणारे अमित चिंतामणी यांच्या सौभाग्यवती प्रांजलताई अमित चिंतामणी या नगराध्यक्षपदाच्या दावेदार असल्याची नागरिकांमधून शहरात चर्चा ऐकायला मिळत आहे. अमित चिंतामणी यांच्या पक्षाशी एकनिष्ठेतेची पक्षप्रमुखांनी सकारात्मक विचार करून प्रांजलताई चिंतामणी यांची उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी शहरातील नागरिकांच्या चर्चेतुन ऐकायला मिळत आहे. गणेश उत्सवा दरम्यान जामखेड शहरात अनेक मंडळांनी विविध सामाजिक उपक्रम राबवत गणेशउत्सव उत्साहात साजरा केला.
शहरातील प्रसिद्ध व्यापारी तथा नगरसेवक अमित चिंतामणी यांनी गणेशोत्सव काळात काही परंपरा जपल्या तर काही बाबींचा नवीन पायंडा पाडला. लोकाभिमुख होण्याचा पायंडा कौतुकास्पद आहे. शहरातील सर्व लहान मोठ्या गणेश मंडळाच्या पदाधिकारी व मंडळाशी संबधीत लोकांचा सार्वजनिक ठिकाणी या जाहीर सत्कार करण्यात आला. या सत्काराच्या कार्यक्रमातुन आपलेपणा व आम्ही सदैव तत्पर आहोत हे सांगण्याचा चांगला प्रयत्न केला.नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या संकल्पनेतून गेल्या ११ वर्षापासून मोठ्या भक्तीभावाने गणेश विसर्जन मिरवणुक दरम्यान सर्व गणेश भक्तांचे मित्रमंडळाच्या वतीने स्वागत करण्यात येते. विविध सणांच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक मेजवानीचा जामखेड करांना आनंद देणारे तसेच सामाजिक, धार्मिक, सलोखा जपणारे व्यक्तिमत्व म्हणजे अमित चिंतामणी होय.
नगरपरिषदचे नगरसेवक म्हणून काम करत असतांना विधानसभेचे सभापती प्रा राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या प्रभागासह शहरात एक वेगळा ठसा उमटवला आहे. एक कर्तव्यदक्ष, सर्वसमावेशक, लोकाभिमुख नेतृत्व म्हणून अमित चिंतामणी यांची शहरात चर्चा आहे. समाजातील कोणत्याही घटकाच्या मदतीला आपल्या परिने धावून जाणारे अमित चिंतामणी चांगले सर्वपरिचित आहेत. अमित चिंतामणी यांच्या सौभाग्यवती प्रांजलताई अमित चिंतामणी यांना नगराध्यक्षपदाची भाजपाकडून संधी मिळावी. नगराध्यक्षपदाची जवाबदारी मिळाल्यास जामखेड शहराचा प्रलंबित विकास भरून काढण्यासाठी दमदार नेतृत्व मिळेल अशी नागरिकांमधून चर्चा ऐकायला मिळत आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
