Homeव्हिडिओ बातम्याआकाश बाफना यांच्या आदर्श फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम स्वखर्चातून दुरूस्ती केलेल्या मोरे...

आकाश बाफना यांच्या आदर्श फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम स्वखर्चातून दुरूस्ती केलेल्या मोरे वस्तीवरील पुलाचा लोकार्पण सोहळा नागरीकांच्या हस्ते नगराध्यक्षपदासाठी पायलताई आकाश बाफना यांच्या नावाला नागरिकांच्या चर्चेतुन पसंती मिळत आहे

आकाश बाफना यांच्या आदर्श फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

स्वखर्चातून दुरूस्ती केलेल्या मोरे वस्तीवरील पुलाचा लोकार्पण सोहळा नागरीकांच्या हस्ते

नगराध्यक्षपदासाठी पायलताई आकाश बाफना यांच्या नावाला नागरिकांच्या चर्चेतुन पसंती मिळत आहे

जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरात आकाश बाफना स्वखर्चातून जनतेला सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात अग्रेसर आहेत.
जामखेड नगरपरिषद हद्दीतील श्रीकृष्ण नगर मोरे वस्तीकडे जाणाऱ्या पडझड झालेल्या पुलाची पावसाळ्यात मोठी दुरवस्था झाली होती यामुळे नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली होती याकडे नगरपरिषद प्रशासन व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने अखेर आदर्श फाऊंडेशन चे अध्यक्ष आकाश बाफना यांनी स्वखर्चातून संपूर्ण पुलाची दुरुस्ती केली आहे. याचे काल आचारसंहिता लागण्याच्या आगोदर लोकार्पण मोरे वस्ती येथील नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. आकाश बाफना यांनी पुढाकार घेऊन पुल दुरुस्ती केल्या बद्दल मोरे वस्ती वरील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
धोकादायक बनलेल्या पुलाची दुरुस्ती केल्याने मोरे वस्तीवरील नागरिकांनी आदर्श फाऊंडेशन व आकाश बाफना यांचे आभार मानले स्थानिक नागरिकांनीही आदर्श फाउंडेशनच्या कामाचे कौतुक केले आहे.
नादुरुस्त पुलामुळे नागरिकांचे खुपच हाल होत होते अपघातही होत होते. नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी केली होती. पण प्रशासन ठप्प होते. ही गोष्ट आकाश बाफना यांच्या लक्षात आली त्यांनी लगेच आपल्या आदर्श फाऊंडेशन मार्फत पुलाची दुरुस्ती केले. आणि मोरे वस्ती वरील नागरिकांच्या हस्ते लोकार्पण केले. आदर्श फाऊंडेशनने शहरासह वाडी वस्तीवर कोट्यवधी रुपयांची पदरमोड करून अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. यामुळे जनतेच्या मनात नगराध्यक्ष पदासाठी पायलताई बाफना यांना पसंती मिळत आहे.

 

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215*

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!