Homeव्हिडिओ बातम्याभाजप कार्यकर्त्यांना जपणारा पक्ष - प्रा मधुकर राळेभात :आम्ही मुंडे - शिंदेंचे...

भाजप कार्यकर्त्यांना जपणारा पक्ष – प्रा मधुकर राळेभात :आम्ही मुंडे – शिंदेंचे कार्यकर्ते ;एकनिष्ठेतेला चांगले फळ मिळते- अजय काशिद :खर्डा गटातुन रवि सुरवसे यांनी निवडणूक लढवावी जनतेची मागणी: रवि सुरवसे यांच्या संपर्क कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन

भाजप कार्यकर्त्यांना जपणारा पक्ष :- प्रा मधुकर राळेभात 

आम्ही मुंडे – शिंदेंचे कार्यकर्ते ;एकनिष्ठेतेला फळ मिळते :- अजय काशीद 

 

खर्डा गटातुन रवि सूरवसे यांनी निवडणुक लढवावी  मतदार व जनतेची मागणी

 

रवि सुरवसे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न 

 

जामखेड प्रतिनिधी

 

भारतीय जनता पक्ष हा भारतातला सर्वाण मोठा पक्ष आहे. त्याचे कार्यालय खाली प्रत्येक गावात असले पाहिजे. प्रत्येक भागात असले पाहिजे. पक्षासाठी काम करतांना माणुसकी महत्वाची गोष्ट आहे हे लक्षात ठेवली पाहिजे. कार्यकर्ता फुटला की आपल्या अनेक गोष्टी बाहेर घेऊन जातो त्यामुळे कार्यकर्ते जपा फुटु देऊ नका. संधी सर्वांना मिळते काम करत रहा. समोरच्या आमदारांची कार्यकरत्यांना न धरता नोकरांना धरून काम करण्याची पध्दत आहे. पक्ष हा सर्व कार्यकर्त्यांचा असतो मात्र पक्ष कूटुंबाला असतो मालकी त्यांची असतो अशी त्यांची धारणा आहे असे नाव न घेता आ रोहित पवार यांच्यावर प्रा मधुकर राळेभात यांनी टीकास्त्र सोडले. पंचायत समितीचे माजी उपसभापती, भाजपा नेते रविंद्र सुरवसे यांच्या संपर्क कार्यालयाचे खर्डा येथे मान्यरांच्या उपस्थितीत भव्य उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

श्री सिध्दसंत सिताराम महाराज गडाच्या पायथ्याशी झालेल्या या उद्घाटनप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे, जेष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात, बाजार समितीचे सभापती शरद कारले, उपसभापती नंदकुमार गोरे, संचालक विष्णू भोंडवे सचिन घुमरे, भाजपा जामखेड मंडलाध्यक्ष संजय काशिद,माजी तालुकाध्यक्ष अजय काशीद,नगरसेवक अमित चिंतामणी,माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, पांडुरंग उबाळे,अँड प्रविण सानप, भिमराव कापसे, लहू शिंदे,डॉ अल्ताफ शेख, मनोज कुलकर्णी डॉ ज्ञानेश्वर झेंडे, प्रशांत शिंदे, भाऊसाहेब गायकवाड, किशोर कांकरिया, ईश्वर मुरूमकर, पोपट जमदाडे, मच्छिंद्र गिते, महालिंग कोरे, राहूल चोरगे, बापूसाहेब माने, प्रशांत शिंदे, सूभाष जायभाय, गोरख घनवट, महारुद्र महारनवर संतोष गिते, उध्दव हुलगुंडे, पंचायत समितीच्या उपसभापती मनिषाताई सूरवसे, सरपंच दिपालीताई गर्जे, आदि मान्यवरांसह खर्डा गटातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना करतांना रविंद्र सुरवसे म्हणाले की सर्व सामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी लोकांच्या संपर्कसाठी हे संपर्क कार्यालय आहे. २०१९ साली विधानसभेत प्रा राम शिंदे यांच्या पराभवानंतर पंचायत समितीच्या सभापती पदाच्या घडामोडीत माझे अपहरण झाले. मोठा त्रास सहन करावा लागला. हे सर्वांना माहित आहे तरी मी भाजप पक्ष व प्रा राम शिंदे साहेब यांची साथ सोडली नाही. राम शिंदे यांच्या माध्यमांतून खर्डा बस स्टँड, खर्डा किल्ला, सिताराम गड आदी विकासकामांसाठी मोठा निधी आणला. व कामही केले आहेत. आईवडीलाच्या व जनतेच्या आशिर्वादाने आजारातून बाहेर आलो. पुन्हा जनतेच्या सेवेत मनापासून रूजू झालोय. आता मी जिल्हा परिषद खर्डा गटातून निवडणूकीत उभा रहात आहे. पक्ष माझ्या एकनिष्ठेतेचा विचार करीन. तुम्ही मायबाप जनता आशिर्वाद द्या अशी साद रविंद्र सुरवसे यांनी जनतेला घातली.

यावेळी भाजपा नेते व नगरसेवक अमित चिंतामणी म्हणाले की खर्डा व परिसरातील लोकांचे विविध काम रविदादा सूरवसे यांच्या या कार्यालयाच्या माध्यमातून मार्गी लागतील. अनेकांच्या जामखेडला चकरा मारणे कमी होईल. रवि सुरवसे यांनी अनेक वेळा विरोधकांना अंगावर घेतले. पक्षाशी व राम शिंदे यांच्याशी एकनिष्ठ राहून जनतेची काम करत राहिले.

 

सभापती शरद कारले म्हणाले की मी पहात आहे की रवि सुरवसे १५,२० वर्षापासून पक्षाशी एकनिष्ठ राहून सामान्य जनतेचे काम करत आहेत. जनतेला साथ देत आहेत. त्यामुळे या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना ही जनता भरभरून साथ देईल अशी अपेक्षा आहे.

भाजपा माजी तालुकाध्यक्ष अजय काशीद म्हणाले की पंचायत समिती सभापती निवडीच्या वेळी रवि दादांना झालेला त्रास मी स्वतः पाहिला आहे. जीवे मारण्याची धमकी, अपहरण या भयानक घडामोडींचा मी साक्षीदार आहे. जेव्हा आम्ही राम शिंदे साहेबांना चौडीत भेटायला गेलो तेव्हा साहेब म्हणाले की “रवि तु महत्वाचा आहे मला. राम शिंदे यांचे हे वाक्य ऐकुन रविदादा बद्दल आणखी इज्जत मनात वाढल”.  एवढी भीती असूनही रवि एकनिष्ठ राहिले. राम शिंदे साहेबांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कडुन घेतलेली शिकवण राम शिंदे यांच्याकडुन आमच्याकडे येते. आम्ही पण मूंडे-शिंदे यांचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे एकनिष्ठेचे फळ रवि सुरवसे यांना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो असे अजय काशीद बोलतांना म्हणाले.

तालूकाध्यक्ष बापुराव ढवळे म्हणाले की इतर पक्ष कुटुंब चालविण्यासारखा पक्ष चालवतात मात्र भाजपा एकमेव पक्ष आहे जो सर्वांना समान संधी व कार्यकर्ते जपण्याचे काम करतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनूसंगाने इच्छूकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्याअनुषंगाने पंचायत समितीचे माजी उपसभापती रविंद्र सुरवसे यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले आहे. या कार्यालयाला भाजपा जामखेड शहराध्यक्ष संजय काशिद यांनीही मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. यावेळी अनेक मान्यवरांनी व कार्यकर्त्यांनी शूभेच्छा दििल्या .

विशेष म्हणजे यावेळी बोलतांना सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रवि सुरवसे यांच्या कामाचा व पक्षाशी एकनिष्ठतेचा विशेष उल्लेख केला.

खर्डा पंचक्रोशीतील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी रवि सुरवसे यांना शूभेच्छा दिल्या. 

या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे यांनी केले.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!