Homeव्हिडिओ बातम्याहातात गावठी घेऊन दहशत करणारयाला ताब्यात घेण्यात जामखेड पोलीसांना यश :अनेकवेळा पोलीसांना...

हातात गावठी घेऊन दहशत करणारयाला ताब्यात घेण्यात जामखेड पोलीसांना यश :अनेकवेळा पोलीसांना गुंगारा देणारा :

हातात घेऊन दहशत करणारयाला ताब्यात घेण्यात जामखेड पोलिसांना यश:

अनेकवेळा गुंगारा देणारा पोलीसांच्या ताब्यात :

जामखेड प्रतिनिधी

हातात गावठी कट्टा घेऊन दहशत निर्माण करणारयाला सापळा रचून शिताफिने ताब्यात घेण्यात जामखेड पोलीसांना यश आले.

पोलिसांकडून मिळालेली माहीती अशी की, दि. ३०/०८/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, इसम नामे अजित लालासाहेब उबाळे रा. चोंडी ता. जामखेड जि. अहिल्यानगर हा चोंडी ते चापडगाव रोडवर त्याचे हातात अग्नीशस्त्र हत्यार विनापरवाना जवळ बाळगून फिरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी तातडीने सपोनि नंदकुमार सोनवलकर, पोलीस कॉन्स्टेबल देविदास पळसे, कुलदिप घोळवे यांचे एक पथक तयार केले. सदरचे पथक खाजगी वाहनाने इसम नामे अजित लालासाहेब उबाळे रा. चोंडी ता. जामखेड जि. अहिल्यानगर याचा शोध घेणेकामी चोंडी येथे रवाना केले. चोंडी गावात शोध घेत असताना अजित लालासाहेब हा १८/३० वाजणेचे सुमारास पथकाला चौंडी ते चापडगाव जाणारे रोडवर सिना नदीच्या पुलाजवळ दिसला. त्यावेळी त्याचे हातात अग्णीशस्त्र हत्यार दिसुन आले.पथकातील पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला त्यावेळी तो पथकास पाहून नदीच्या किनारी असलेल्या काटेरी झाडात पळुन गेला होता. त्यानंतर दि. ०२/०९/२०२५ रोजी इसम नामे अजित लालासाहेब उबाळे हा गावठी कट्टा हत्यार विनापरवाना निर्माण करताना दिसुन आला आहे. म्हणुन त्याचे विरूध्द बेकायदा स्वतःचे ताब्यात बाळगुन लोकांमध्ये दहशत निर्माण करतांना दिसुन आला. पोलीस कॉन्स्टेबल कुलदिप पांडुरंग घोळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याचे विरुध्द भारतीय हत्यारकायदा कलम ३/२५ व फौजदारी कायदा सुधारणा अधिनियम १९३२ चे कलम ७ सह महाराट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३)/१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनतर सदर आरोपीचा शोध घेत असताना तो जामखेड तालुक्यातील पाटोदा गावच्या शिवारात येणार असल्याची गुप्त बातमी दारामार्फत माहीती मिळाली. त्यानुसार सपोनि नंदकुमार सोनवलकर, पोलीस कॉन्स्टेबल देविदास पळसे, पो कॉन्स्टेबल कुलदिप घोळवे यांनी सदर ठिकाणी सापळा रचून आरोपी अजित लालासाहेब उबाळे यास त्याचे जवळील गावठी कटटयासह ताब्यात घेतले आहे.

सदरची अधिक्षक कारवाई सोमनाथ पोलीस घार्गे पोलीस अहिल्यानगर, अपर अधीक्षक अहिल्यानगर, वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे कर्जत विभाग कर्जत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक
दशरथ चौधरी, सपोनि नंदकुमार सोनवलकर, पोकॉ देविदास पळसे, पोकॉ कुलदिप घोळवे तसेच दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पोकॉ नितीन शिंदे यांनी केली आहे. जामखेड पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कामगिरी मुळे जामखेड पोलीसांचे कौतुक होत आहे.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!