हसता हसता मृत्यूने गाठले, वर्षाने सोडले प्राण सोडला ,
परंडा येथील महाविद्यालयात निरोप घेऊन समारंभात मनोगत व्यक्त करताना दुर्दैवी घटना
जामखेड प्रतिनिधी
गेल्या काही महिन्यापासून आकस्मित मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पहावयास मिळत आहे. व्यायाम करताना, शाळेत चालताना, अचानक हृदयविकारायचा झटका येऊन अनेकांचा जीव गेल्याच्या घटना समोर येत आहेत.
अशाच प्रकारची घटना धाराशीव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातून ही हृदयदायक घटना समोर आली आहे, परंडा येथील एका कॉलेजमध्ये निरोप समारंभाचे भाषण देत असतांनाच एका विद्यार्थिनीला मृत्यूने गाठले भाषण संपवत असताना विद्यार्थिनी खाली कोसळली त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयासह कॉलेजवर शोककळा पसरली आहे.
निरोप समारंभात भाषण करताना चक्कर येऊन पडल्यानंतर विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना परंडा शहरातील रा.गे. शिंदे महाविद्यालयात घडली. २० वर्षीय वर्षा खरात असे या विद्यार्थ्यांनीचे नाव आहे. बीएससीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ सुरू असताना वर्षा भाषण करत होती, मात्र ती अचानक खाली कोसळल्याने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला सर्वांनी वर्षाकडे धाव घेतली आणि तिला रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तिला तपासून वर्षाला मृत घोषित केले.
वर्षाच्या मृत्यूची बातमी कळताच सर्वत्र शोककळा पसरली काही मिनिटापूर्वी भाषण देत असलेली वर्षा आपल्यातून निघून गेल्याची दुःख बातमी विद्यार्थी, शिक्षक व कुटुंबियांना सहन झाली नाही व ते त्यांना खरेही वाटत नव्हते.
या घटनेमुळे महाविद्यालय प्रशासन आणि विद्यार्थ्यांकडून हळहळ व्यक्त करत येत आहे वर्षा भाषण करत असताना हा प्रकार घडला त्यावेळी तिचे भाषण कोणीतरी मोबाईल मध्ये रेकॉर्ड करत होते तो व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात वर्षा खाली कोसळताना दिसत आहे.
दरम्यान वर्षाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, वाढलेल्या उन्हामुळे तिला भोवळ आल्याने ही घटना घडल्याचे काही जणांचे म्हणणे आहे तर, काहींच्या मते वर्षाला हृदयविकाराचा झटका आला होता मात्र डॉक्टरांकडून वर्षाच्या मृत्यूच्या मागील कारणांचा शोध घेतला जात आहे.
शिक्षणानंतर आयुष्याचे चित्र रंगवीत असताना भविष्याचे सोनेरी स्वप्न पाहत असताना कार्यक्रमात खळखळून हसणाऱ्या वर्षांने जगाचा अचानक निरोप घेतला त्यामुळे सर्वांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या जीवन हे किती क्षणभंगुर आहे हे या घटनेने अधोरेखित केले आहे. 

” भाषणात काय म्हणत होती वर्षा “-
वर्षाने भाषणात बोलताना सांगितले की प्रत्येक जण आपापल्या पर्यंत जेवढा जमेल तेवढा अभ्यास करतो.. असे म्हणतात सर्व विद्यार्थी हसू लागले त्यानंतर वर्षा तिच्या शिक्षकांविषयी सांगू लागली असतानाच मात्र तितक्यात ती खाली कोसळली व पुढील दुर्दैवी प्रकार घडला..
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
