Homeव्हिडिओ बातम्यासुर्य आग ओकतोय ;जमीन तापुन निघतेय. एप्रिलमध्ये अंगाची लाही लाही, मे मध्येही...
सुर्य आग ओकतोय ;जमीन तापुन निघतेय. एप्रिलमध्ये अंगाची लाही लाही, मे मध्येही होणार त्राही त्राही? उन्हाच्या काळात बाहेर पडणे टाळा
सुर्य आग ओकतोय ; जमीन तापुन निघतेय!
एप्रिल मध्ये अंगाची लाही लाही, मे मध्येही होणार ‘त्राही त्राही’!
उन्हाच्या काळात बाहेर पडणे टाळा
प्रतिनिधी यासीन शेख
सध्या कडक उन्हामुळे अक्षरशः सुर्य आग ओकत असून जमीन तापुन निघत आहे. अनेक शहरांचा पारा ४०-४४ अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. 
उन्हाचा पारा चाळिशी पार गेल्याने नागरिकांची चांगलींच लाही लाही होत आहे. यंदा ‘अल-निनो’च्या संकटामुळे उन्हाची तीव्रता अधिकच दाहक बनली आहे. गेल्या २४ दिवसांत पावसाचे तब्बल १४ वेळा वर्तवलेले अंदाज फोल ठरल्याने, निसर्गाच्या या लहरीपणाचा फटका सर्वांनाच बसत आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांत जामखेड शहराचे तापमान ३८ ते ४० अंश सेल्सियसवर स्थिर आहे. एप्रिलमध्ये नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे.
मात्र मे मध्येही आणखी तापमान वाढ होणार असून आणखी २ ते ३ अशांनी तापमान वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.एप्रिलच्या सुरुवातीला ढगाळ हवामानामुळे काहीसा दिलासा मिळाला होता; मात्र ६ एप्रिलपासून सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे.अरबी समुद्राकडुन येणारया आर्द्रतेचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे राजस्थान कडुन येणाऱ्या उष्ण लहरी महाराष्ट्रात शिरल्या आहेत. दिवसा कडक उन आणि रात्री ढगाळ वातावरण त्यामूळे उष्णता पडत नाही परिणामी उकाडा वाढत आहे.
मे महिन्यात तापमानाचा पारा वाढणार 
औ

मे महिना सर्वाधिक उष्ण ठरणार
उन्हाळ्यात म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यात अवकाळी पाऊस पडणे, हे वातावरण बदलाचेच लक्षण आहे. एकूणच पृथ्वीवरचे तापमान २ अंशांनी वाढले आहे. भविष्यातही अशा प्रकारे सातत्याने तापमानवाढ होत राहणार आहे. मोठ्या प्रमाणावर झाडे तोडले आणि इंधनाचा वाढलेला अतिरिक्त वापर हे प्रमुख कारण आहेत. 
सध्या एप्रिल महिन्यात तापमान ४० अंशांवर गेले असून, ते एप्रिलअखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. मे महिना मात्र सर्वाधिक उष्ण (हिटचा) ठरण्याचा अंदाज आहे. पुढील २ दिवस तापमान वाढ कायम राहणार असून, काही भागांत हलक्या पावसाचा अंदाज आहे. मात्र, १ मे पासून तापमानात १ ते २ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. मे महिन्यात हे तापमान ४२ अंशांपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे मे महिन्यात तापमान आव्हानात्मक राहणार आहे.

उन्हापासून बचावासाठी महत्त्वाचे उपाय:
दुपारी टाळा प्रवास: सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत थेट उन्हात जाणे टाळा [१२].
भरपूर पाणी प्या: तहान लागली नसली तरीही पाणी, लिंबू सरबत, ताक, नारळ पाणी प्या [७, ८].
संरक्षण: बाहेर जाताना सुती कपडे वापरा, टोपी, छत्री किंवा गॉगलचा वापर करा [८].
लक्षणे ओळखा: चक्कर येणे, डोकेदुखी, उलट्या होणे ही उष्माघाताची लक्षणे असू शकतात.
उन्हाच्या काळात बाहेर पडणे टाळा.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!