Homeव्हिडिओ बातम्यासाठे नगरमधील गटार तुंबले दूर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात खर्डा ग्रामपंचायतचे अक्षम्य दुर्लक्ष...

साठे नगरमधील गटार तुंबले दूर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात खर्डा ग्रामपंचायतचे अक्षम्य दुर्लक्ष .आगळ्यावेगळ्या पद्धतीने निषेध करणार

साठे नगरमध्ये गटार तुंबल्यामुळे, दुर्गंधी,नागरिकांचे आरोग्य धोक्यात.

खर्डा ग्रामपंचायतचे अक्षम्य दुर्लक्ष ; आगळ्यावेगळ्या पद्धतीने निषेध

 

जामखेड प्रतिनिधी 

 खर्डा ग्रामपंचायतचे सार्वजनिक सांडपाणी व्यवस्थापनचा ढीसाळ कारभारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे .

खर्डा शहरातील साठे नगर येथील रहिवाशी छाया पंडित शिंदे व आश्रुकांत मोरे,आणि दत्ता गामाजी मोरे यांच्या घरासमोरून वाहणारी गटार गेल्या पंधरा दिवसापासुन तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे.यामुळे साठे नगर परिसरात सर्वञ दुर्गंधी पसरली असुन येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

खर्डा येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश (भाऊ) जाधव यांनी खर्डा ग्रामपंचायतला वारंवार तक्रार करूनही या गटार दुरूस्ती कामाकडे खर्डा ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे.ग्रामपंचायत प्रशासनाला व पुढारयांना नागरिकांच्या आरोग्याचे काही देणे घेणे दिसत नाही . नागरिक ग्रामपंचायतच्या मनमानी कारभाराला वैतागले आहेत .

पुढील दोन ते तीन दिवसात गटार दुरूस्ती न केल्यास खर्डा ग्रामपंचायतचा आगळ्या वेगळ्या पध्दतीने जाहीर निषेध केला जाईल असा इशारा लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश (भाऊ) जाधव व युवा पञकार संघाचे अध्यक्ष पञकार रिजवान बागवान यांनी दिला आहे.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!