Homeव्हिडिओ बातम्याजामखेडमध्ये अवैध दारू विक्री पाच ठिकाणी छापा खर्डा पोलिसांची कारवाई ;४१ हजारांचा...

जामखेडमध्ये अवैध दारू विक्री पाच ठिकाणी छापा खर्डा पोलिसांची कारवाई ;४१ हजारांचा माल जप्त

जामखेडमध्ये अवैध दारू विक्रीवर मोठी कारवाई; पाच ठिकाणी छापे, पाच गुन्हे दाखल

खर्डा पोलीस पथकाची धडक मोहीम; ४१ हजार ४७० रुपयांचा देशी-विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त

जामखेड प्रतिनिधी –

अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार जामखेड शहरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीविरोधात खर्डा पोलीस ठाण्याच्या पथकाने धडक कारवाई करत पाच ठिकाणी छापे टाकून पाच गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत ४१ हजार ४७० रुपयांचा देशी व विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षकांना गुप्त बातमीदारामार्फत जामखेड शहरातील विविध ठिकाणी अवैधरित्या दारू विक्री होत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्या माहितीच्या आधारे खर्डा पोलीस ठाण्याचे सपोनि उज्वलसिंह राजपूत यांना विशेष कारवाईचे आदेश देण्यात आले होते.

त्यानुसार सपोनि राजपूत यांनी पथकासह जामखेड शहरात छापेमारी मोहीम राबवत खालील पाच ठिकाणी कारवाई केली :

हॉटेल सागर, खर्डा रोड, जामखेड

हॉटेल तांबे, खर्डा रोड, जामखेड

हॉटेल साई, खर्डा रोड, जामखेड

हॉटेल साहेबा, खर्डा रोड, जामखेड

हॉटेल पाटीलवाडा, नगर रोड, जामखेड

या कारवाईदरम्यान अवैधरित्या साठवून ठेवलेला देशी व विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून जामखेड पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये पाच स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या प्रकरणी सागर पांडुरंग नेटके, ज्ञानेश्वर रंजित तांबे, राजेंद्र रामभाऊ देवकाते, सचिन विक्रम तनपुरे आणि उमेश विनोद मुळे या हॉटेल चालक-मालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलबुर्गे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. खर्डा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि उज्वलसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार शशी म्हस्के, पंडित हंबर्डे, धनराज बिराजदार, अशोक बडे आणि गणेश बडे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.

चौकट –

शहर बीट अंमलदार पोलीस कर्मचारी शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांना पाठीशी घालत आहेत का? त्यांचे कोणाशी लागेबांधे आहेत का? याची सखोल चौकशी पोलीस निरीक्षकांनी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच शहराला या अवैध व्यवसायांच्या विळख्यातून मुक्त करावे, अशीही मागणी जोर धरत आहे. काही नागरिकांनी शहर बीट अंमलदार पोलीस वर्तणुकीबाबत नाराजी व्यक्त करत, नागरिकांशी उग्रट व फुगरट भाषेत संवाद साधला जात असल्याचा आरोपही केला जात आहे.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!